नवी दिल्ली, 16 मार्च: मुलांमध्ये मान (Neck) आणि पाठदुखीच्या (Back Pain) तक्रारी वाढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे रुग्णालयांच्या ओपीडींमध्ये अशा स्वरुपाच्या तक्रारी असलेल्या बालरुग्णांचे प्रमाण सुमारे 50 टक्क्यांनी वाढले आहे. ऑनलाईन क्लासेस (Online Classes) दरम्यान चुकीच्या पद्धतीनं बसल्यामुळे ही समस्या वाढत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. चुकीच्या पद्धतीनं बसल्यामुळे मुलांमध्ये (Children) हाडं आणि स्नायूंशी संबंधित समस्या वाढू शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) शिक्षण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. मुलांचा कोरोना संसर्गापासून बचाव व्हावा, या उद्देशानं शाळा बंद करण्यात आल्या. मात्र मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय सुरु झाला. आता ऑनलाईन शिक्षणाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. ऑनलाईन क्लासेसमुळे दीर्घकाळ एकाच ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीनं बसल्यामुळे (Sitting) मुलांना हाडं आणि स्नायूंच्या समस्या जाणवत आहेत. परिणामी मान आणि पाठदुखीच्या तक्रारी वाढल्या आहेत. वैद्यकिय तज्ज्ञांनीदेखील या गोष्टीला दुजोरा दिला आहे.
नक्की कशी असते CMAT Exam? पॅटर्नपासून अप्लाय लिंकपर्यंत इथे मिळेल माहिती
"कोरोनाच्या साथीमुळे शाळा बंद असल्याने, स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणं ही बाबदेखील मान आणि पाठदुखीसाठी कारणीभूत ठरू शकते. यामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. या समस्येमागं अयोग्य पद्धतीनं बसणं हे प्रमुख कारण आहे," असं अस्थिरोग विशेषज्ज्ञ, जालंधर येथील एनएचएस हॉस्पिटलमधील रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आणि संचालक डॉ. शुभांग अग्रवाल यांनी सांगितलं.
मुलांमध्ये अस्थिविकाराचं प्रमाण 50 टक्क्यांनी वाढलं
डॉ. अग्रवाल म्हणाले, "मुलांमधल्या हाडांच्या आजाराशी (Orthopedic) संबंधित केसेसमध्ये 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यापैकी बहुतांश केसेस या जास्त वजन, चिंता आणि अन्य विकारांशी संबंधित आहेत.`` वसंत कुंजमधील इंडियन स्पायनल इंज्युरीज सेंटरचे पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सुरभित रस्तोगी यांनी सांगितलं, ``बऱ्याच मुलांना मान आणि पाठीत कडकपणा किंवा आखडलेपणा (Stiffness) जाणवत आहे, जो मुख्यतः काम करणाऱ्या प्रौढ लोकांमध्ये दिसून येतो. याचं प्रमुख कारण म्हणजे मुलं सर्वाधिक वेळ घरातच राहिल्यानं त्यांना सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात न मिळणं हे आहे."
सुवर्णसंधी! Indian Navy तर्फे 'या' पदांच्या 2500 जागांसाठी भरतीची मोठी घोषणा
"जेव्हा मुलं पाठदुखीची तक्रार करतात, तेव्हा बऱ्याचदा त्यामागे गंभीर कारण असते. अशावेळी दुखापत, संसर्ग किंवा ट्यूमर असू शकतो. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेणं गरजेचं आहे," असं आग्रा येथील उजाला सिग्नस रेनबो हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. विशाल गुप्ता यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Online education, Problem