मुंबई, 01, जून : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल कधी जाहीर होतो याकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं होतं. आपली मुलं चांगल्या मार्कांनी पास होतील का? याचं टेन्शन पालकांना आलं आहे. मात्र आता स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल नक्की कधी लागणार याबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. उद्या म्हणजेच 02 जून रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर (maharashtra ssc result 2023) होणार आहे असं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावीचा निकाल 02 जून ला जाहीर होणार आहे. यंदा 13 लाखांहून अधिक विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या HSC ला बसले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बारावीचा निकाल अधिकृत संकेतस्थळ mahresults.nic.in वर जाहीर करणार (10th ssc result 2023 date) असल्याची माहिती मिळाली आहे.
SSC Result 2023: लक्ष द्या! 10वीनंतर फक्त 12वी हाच पर्याय नाही; ‘हे’ शॉर्ट टर्म कोर्सेस करूनही होऊ शकता मालामालयाशिवाय, https://lokmat.news18.com/tag/ssc-result/ या लिंकवर क्लिक करून विद्यार्थी महाराष्ट्र SSC निकाल 2023 थेट पाहू शकतात. तसंच निकालासंदर्भातील क्षणोक्षणीच्या अपडेट्स तुम्हाला फक्त News18 लोकमतवर बघायला मिळणार आहेत. 2 ते 25 मार्च दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा आहेच. महाराष्ट्र बोर्डच्या mahresult.nic.in आणि mahahsscboard.in. या वेबसाईटवर जाऊन निकाल चेक करता येणार आहे. News18Lokmat च्या वेबसाईटवरही हा निकाल पाहता येणार आहे. त्यासाठी आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन केल्यावर एक लिंक येईल त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही निकाल पाहू शकता.
12वी विसरा; दहावीनंतरच्या ‘या’ भन्नाट डिप्लोमा कोर्सेसबद्दल ऐकलंय का? लाखो रुपये मिळेल सॅलरीNews18 लोकमत वेबसाईटवर असा चेक करा निकाल
सुरुवातीला https://lokmat.news18.com/news/career/board-results-maharashtra-board/ ही लिंक ओपन करा. यानंतर तुम्हाला बातमीच्या मध्ये एक बॉक्स दिसेल. यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. यांनतर आईचं नाव लिहायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमचा क्लास म्हणजे दहावी की बारावी हे सिलेक्ट करायचं आहे. यानंतर खाली देण्यात आलेल्या गणिताच्या कोड्याचं उत्तर द्यायचं आहे. यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे. यानंतर हा निकाल तुम्हाला सेव्हही करता येणार आहे.
SSC Result 2023: लक्ष द्या! 10वीनंतर फक्त 12वी हाच पर्याय नाही; ‘हे’ शॉर्ट टर्म कोर्सेस करूनही होऊ शकता मालामालया वेबसाईट्सवर चेक करू शकता निकाल https://lokmat.news18.com/news/career/board-results/ mahahsscboard.in mahresult.nic.in