मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

SSC, HSC Exam 2021: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, रद्द झालेल्या परीक्षांचे शुल्क परत मिळणार

SSC, HSC Exam 2021: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, रद्द झालेल्या परीक्षांचे शुल्क परत मिळणार

Big relief for SSC, HSC students: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना एक मोठा दिलासा देणारा शिक्षण मंडळाने घेतला आहे.

Big relief for SSC, HSC students: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना एक मोठा दिलासा देणारा शिक्षण मंडळाने घेतला आहे.

Big relief for SSC, HSC students: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना एक मोठा दिलासा देणारा शिक्षण मंडळाने घेतला आहे.

मुंबई, 12 नोव्हेंबर : दहावी (SSC) आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (HSC students) महत्त्वाची बातमी आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या. त्यामुळे आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी भरलेलं परीक्षा शुल्क आता त्यांना परत मिळणार आहे. शिक्षण मंडळाने (Maharashtra State board of secondary and higher secondary education Pune) एक परिपत्रक काढून या संदर्भातील माहिती दिली आहे. पाहूयात या परिपत्रकारत नेमकं काय म्हटलं आहे. (SSC, HSC students will get fees refund due to exam cancellation)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मार्फत सन 2021 मधील इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या मुख्य परीक्षा शासन निर्णयानुसार (कोविड -19 च्या प्रादुर्भावामुळे) रद्द करण्यात आली होती. तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार मंडळाने सन 2021 मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12वी) चे परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या रकमेचा परतावा अंशत: करण्यात येत आहे.

यासाठी माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांनी विद्यार्थ्यांचा तपशील दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11 पासून मंडळाचे 1) इयत्ता 10वी आणि 12वी साठी mahasscboard.in 2) इयत्ता 10वी साठी https://feerefund.mh-ssc.ac.in 3) इयत्ता 12वीसाठी https://feerefund.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरुन लिंकद्वारे नोंदविणे आवश्यक आहे.

इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी 12 नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारले जाणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेची आवेदनपत्रे शुक्रवार दि. 12 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरावीत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

सदर परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यामध्ये उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL डाटाबेसवरून नियमित शुल्कासह 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत भरावयाची आहेत.

तर उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थी, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीप्रमाणे शुक्रवार दि. 3 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहेत. विलंब शुल्कासह हे अर्ज 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत भरता येतील. तर, उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी 12 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2021 असा आहे.

First published:

Tags: Board Exam, HSC, Ssc board