• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • 12th Exams 2022: राज्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी 12 नोव्हेंबरपासून स्वीकारले जाणार अर्ज; शिक्षणमंत्र्यांची माहिती

12th Exams 2022: राज्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी 12 नोव्हेंबरपासून स्वीकारले जाणार अर्ज; शिक्षणमंत्र्यांची माहिती

12 नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

 • Share this:
  मुंबई, 10 नोव्हेंबर: राज्यात कोरोनामुळे 2021 च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यात. मात्र आता वर्ष 2022 च्या इयत्ता बारवीच्या परीक्षा (12th Exams 2022) होणार आहेत. त्यानुसार आता शाळा आणि महाविद्यालयं सुरु करण्यात आली आहेत. इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांसाठी (12th exam 2022 maharashtra board) आता येत्या 12 नोव्हेंबरपासून अर्ज (Application form for 12th exam 2022) स्वीकारण्यात येणार आहेत अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसंच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत. अर्ज करण्याचा कालावधी जारी केलेल्या वेबसाइटवरून विद्यार्थ्यांनी नियमित शुल्कासह 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत अर्ज करायचे आहेत. तर विलंब शुल्कासह हे अर्ज 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत भरता येणार आहेत. तसंच उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी 12 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2021 इतका असणार आहे. या वेबसाईटद्वारे करा अर्ज वर्ष 2022 च्या इयत्ता बारवीच्या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर (Website for Application form for 12th exam 2022) जाऊन ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. परीक्षा शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध पेमेंट पर्यायांचा वापर करता येणार आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published: