मुंबई, 24 फेब्रुवारी : इयत्ता दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरू होत आहे. 3 मार्च ते 23 मार्च या कालावधीमध्ये परीक्षा होणार आहे. जवळपास संपूर्ण अभ्यास आपला होत आला आहे. आता या अभ्यासावर आपल्याला पेपर लिहायचा आहे. भाषा विषयात लिखाण खूप असतं. बऱ्याचदा लेखनाचा कंटाळा किंवा सूचत नाही म्हणून आपण प्रश्न सोडवत नाही अशावेळी काही छोट्या गोष्टी पेपर लिहिण्याआधी डोक्यात ठेवल्या तर आपल्याला वेळत नीट पेपर सोडवून चांगले मार्क मिळवता येतील. पास होण्यासोबतच चांगले मार्क मिळवण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. परीक्षा केंद्रावर जाण्याआधी या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. 1. पेपरला जाण्याआधी पेपरचा पॅटर्न पाहा. कोणत्या प्रश्नाला किती मार्क आहेत हे पाहून त्यानुसार वेळेचं नियोजन करा. 2. उत्तर लिहिताना प्रश्न क्रमांक आणि त्यातील उप प्रश्न नीट क्रमांक देऊन सोडवा. नवीन प्रश्न नव्या पानावर सोडवा. 3. सोप्या प्रश्नाकडून अवघड प्रश्नाकडे या त्यामुळे आपला वेळ वाचेल. पत्र लेखन, निबंध जिथे मार्क मिळून देणारे प्रश्न आहेत ते सोडू नका किमान ते पहिले सोडवण्यावर भर द्या. हेही वाचा-Board Exam : परीक्षेचं टेन्शन दूर करायचं असेल तर एकदा हे VIDEO पाहाच 4. पेपर सोडवताना खाडाखोड, गजबन करू नका. सुटसुटीत आणि छान मुद्देसुत लिहा. विषयाची सुरुवात आणि शेवट चांगला करा. त्यामुळे पर्यावेक्षकावर त्याचा प्रभाव चांगला पडतो. 5. गद्य प्रश्न लिहिताना परिच्छेदाचा वापर करा. लिहिणार चुका होणार नाहीत लेखन शुद्ध असेल याची काळजी घ्या. 6 .हातात पेपर आल्यावर नीट शांत डोकं ठेवून वाचा. एक प्रश्न दोन वेळा वाचा त्यामुळे प्रश्न समजायला मदत होईल. रश्न वाचताना त्यामध्ये एखादा की-वर्ड आपल्याला सापडतो. त्या की-वर्ड भोवती आपलं उत्तर फिरतं राहायला हवं. तपासणारा व्यक्तीकडे वेळ नसेल तर तो नजर फिरवून साधारण मार्क देईल. 7. एक प्रश्न दोन ते तीन वेळा वाचा. त्यामुळे तो प्रश्न तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. त्यातून आपल्याला उत्तर सुचेल. किंवा उत्तर काय आणि कसं लिहायचं याचा अंदाज येईल. त्यानुसार सुचेल तसं लिहायला सुरुवात करा. हेही वाचा-बोर्डाच्या परीक्षेला जाण्याआधी 5 महत्त्वाच्या गोष्टी करा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







