बंगळुरू, 08 सप्टेंबर : कोरोना व्हायरसच्या महासंकटात अनेक मजुरांचे कामधंदे बंद पडले. जिथे खायची भ्रांत अशा ठिकाणी ऑनलाइन शिक्षण घेणं तर फक्त कोसो दूरची गोष्ट आहे अशा परिस्थितीत त्यांच्या मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून एका पोलीस अधिकाऱ्यानं पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या महासंकटात देवासारखे वेगवेगळ्या रुपानं पोलीस धावून आले. आता मजुरांच्या मुलांसाठी देखील पोलीस उप-निरीक्षक मदतीला आले आहेत. कर्नाटक राज्यातील बंगळुरू इथल्या अन्नपूर्णेश्वरी नगर परिसरात पोलीस उप-निरीक्षक शांथप्पा जीदमनव्वर हे मजुरांच्या मुलांचं आयुष्य वाया जाऊ नये यासाठी त्यांना शिकवतात.
हे वाचा- कडक! लाखो रुपयांची नोकरी सोडली, नक्षलग्रस्त भागात मुलांना शिकवतंय हे दाम्पत्य ज्या मजुरांची मुलं स्मार्टफोन घेऊ शकत नाहीत. ज्यांना ऑनलाइन शिक्षण शक्य नाही अशा मुलांना पोलीस अधिकारी आपल्या ड्युटीनंतर वेळ काढून रोज शिक्षणाचे धडे देत आहेत. त्यांच्या या कामाचं सोशल मीडियावर तुफान कौतुक होत आहे. तर स्थानिक लोकांनी रियल हिरो आणि रियल सिंघम असंही नाव दिलं आहे. याआधीही सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत पोलिसांनी मदत केल्याचे फोटो व्हायरल झाले होते. शांथप्पा ड्यूटीवर जाण्यापूर्वी मुलांना शिकवतात. ते रस्त्याच्या कडेला बोर्ड घेतात आणि मुलांना जमिनीवर ठेवून त्यांना विनामूल्य शिक्षण देतात. मुलांनी मोलमजुरी अडकू नये किंवा सुविधा मिळत नाही म्हणून त्यांचं वर्ष फुकट जाऊ नये म्हणून पोलीस उप-निरीक्षक आपल्या कार्यासोबतच हे कार्य अगदी नियमितपणे पार पडत आहेत.