जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / MH BOARD SSC RESULT: अपयश आलं म्हणून खचू नका; अजून एक संधी; पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर

MH BOARD SSC RESULT: अपयश आलं म्हणून खचू नका; अजून एक संधी; पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर

कधी आहे पुरवणी परीक्षा

कधी आहे पुरवणी परीक्षा

MH BOARD SSC RESULT: ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत अपयश आलं त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 जून: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education MSBSHSE) मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल (SSC class 10 result) आज जाहीर होत आहे. दुपारी 1 वाजता सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. तसेच मोबाइलवरही एसएमएसच्या माध्यमातून निकाल पाहता येणार आहे. त्यापूर्वी शिक्षण विभागाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. मात्र ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत अपयश आलं त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

जे विद्यार्थी दहावीच्या किंवा बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले किंवा अपयशी ठरले अशा विद्यार्थ्यांना खचून जाण्याची गरज नाही. अशा विद्यार्थ्यांना अजून एक चान्स मिळणार आहे. अशा विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ही जुलै आणि ऑगस्टमध्येच घेतली जाणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही. कधी आहे पुरवणी परीक्षा बारावीचा पुरवणी परीक्षा ही 21 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहे. तर दहावीमध्ये अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ही 27 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहे.या परीक्षांचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार आहे. SSC Result 2022 LIVE: अवघे काही मिनिटं शिल्लक; सर्वात वेगवान निकाल फक्त News18लोकमत वर पालकांचं वाढलं टेन्शन जसे जसे बोर्डाचे निकाल जवळ येऊ लागतात तसं पालकांचं टेन्शन वाढू लागतं. आपल्या मुलांना चांगले मार्क्स मिळतील का? चांगले मार्क्स मिळाल्यानंतर चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल का? अपेक्षेप्रमाणे मार्क्स मिळाले नाहीत तर काय होईल? अशा अनेक प्रश्नांचा गोंधळ पालकणांच्या डोक्यात सुरु असतो. पण अजिबात काळजी करण्याची गरज नाही. 16,38,964 विद्यार्थ्यांचं भविष्य आज ठरणार यंदा महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16,38,964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी संपूर्ण 16,38,964 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी 8,89,505 विद्यार्थ्यांची संख्या आहे तर 7,49,458 इतकी विद्यार्थिनींची संख्या आहे. किती वाजता जाहीर होणार निकाल दरवर्षी प्रमाणे यंदाही दहावी बोर्डाचे निकाल हे सुमारे दुपारी एक वाजताच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात