मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Online अभ्यासासाठी आंबे विकणाऱ्या चिमुरडीच्या हातात अखेर पडला मोबाइल, News18 लोकमत डिजिटलच्या बातमीचा सुखद इम्पॅक्ट

Online अभ्यासासाठी आंबे विकणाऱ्या चिमुरडीच्या हातात अखेर पडला मोबाइल, News18 लोकमत डिजिटलच्या बातमीचा सुखद इम्पॅक्ट

विशेष म्हणजे झारखंडमधील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या चिमुरडीपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. मात्र सोशल मीडियामुळे ते शक्य झालं आहे.

विशेष म्हणजे झारखंडमधील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या चिमुरडीपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. मात्र सोशल मीडियामुळे ते शक्य झालं आहे.

विशेष म्हणजे झारखंडमधील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या चिमुरडीपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. मात्र सोशल मीडियामुळे ते शक्य झालं आहे.

मुंबई, 23 जून : जिथं इच्छा असते तिथं मार्ग नक्की सापडतो, यासाठी तुम्हाला कशाचाही अपेक्षा न करता मेहनत करण्याची तयारी करावी लागते. जमशेदपूरच्या 7 वर्षांच्या चिमुरडीच्या हातात मेहनत करण्याची तयारी होती, त्यामुळे तिला त्याचं फळ मिळालं. जमशेदपूर येथे राहणाऱ्या तुलसीकडे एन्ड्रॉइड फोन नसल्या कारणाने तिला गेल्या वर्षभरापासून ऑनलाइन शिक्षण घेता येत नव्हतं. लॉकडाऊनमध्ये वडिलांची नोकरी गेल्यानंतरही ती हतबल होऊन खचली नाही. तर स्वत: आंबे विकून शिक्षणासाठी पैसे उभा करण्याचा निर्धार केला. कोणी काहीही म्हटलं तरी तिला शिकायचं आहे, आणि याची जबाबदारीहीने तिने स्वत:च उचलली.

तुलसीच्या या निर्धाराबाबत News 18 लोकमत डिजिटलने '7 वर्षांच्या चिमुरडीचा गरीबीशी संघर्ष; Online अभ्यासासाठी आंबे विकून मोबाइल घ्यायची करतेय तयारी' ही बातमी प्रसिद्ध केली होती. त्याचा परिणाम म्हणजे या आंबे विकणाऱ्या हातात ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी मोबाइल आला. VALUABLE Edutainment ने चिमुरडीला तब्बल 1 लाख 20 हजारांची मदत केली आहे. त्यांनी तुलसीला Red Me 9 Power हा 13 हजारांचा मोबाइल आणि वर्षभराचं इंटरनेट रिचार्जही करुन दिलं आहे. त्यामुळे मुलीला शिक्षणात कोणताच व्यत्यय येणार नाही. VALUABLE Edutainment चे MD अमेय हेटे यांनी तुलसीला मदत केली आहे. विशेष म्हणजे 1 लाख 20 हजारांच्या मदतीसाठी त्यांनी तुलसीकडून 12 आंबे विकत घेतले आहे. तुलसीची जिद्द खूप मोठी आहे, त्यामुळे अमेय हेटे यांनी तुलसीकडून 10,000 चा एक आंबा असे 12 आंबे विकत घेतले आहेत.

विशेष म्हणजे झारखंडमधील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या चिमुरडीपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. मात्र News 18 च्या नेटवर्कमधील सहकाऱ्यांच्या पुढाकारामुळे हे शक्य झालं. या निमित्ताने पुन्हा एकदा सोशल मीडियाची ताकद दिसून येत आहे.

हे ही वाचा-शेतमजूर वडिलांच्या मेहनती मुलाची कहाणी; शरण कांबळे यांचं UPSC परीक्षेतलं यश

हातात मोबाइल आल्यामुळे तुलसी खूप आनंदात आहे. आता मन लावून अभ्यास करणार असल्याचं तिने सांगितलं. अमेय हेटे यांनी तुलसीला केलेल्या मदतीमुळे तिचे आई-वडिलांनाही खूप आनंद झाला आहे. मुलीला खूप शिकवून मोठं करीन अशी भावाना तिच्या वडिलांनी व्यक्त केली. तुलसीच्या आईला तिने आंबे विकलेले आवडत नव्हते. मात्र मदत मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर मुलीचं शिक्षण पूर्ण होईल या अपेक्षेने समाधान दिसत आहे. यावेळी तुलसीच्या आईने अमेय हेटे यांचे धन्यवाद मानले.

First published:
top videos

    Tags: Education, Jharkhand, Positive story