जमशेदपुर, 20 जून : कोरोनाने (Corona) अनेकांच्या आयुष्यातून बऱ्याच गोष्टी हिरावून घेतल्या. मात्र तरीही यापैकी अनेकांनी हिंमत न हारता प्रयत्न सुरू ठेवले. जमशेदपुरची तुलसीदेखील त्यापैकी एक आहे. 7 वर्षांची तुलसी किनन स्टेडिअमच्या समोर आंबे विकण्याचं काम करते. रविवारी पूर्ण लॉकडाऊन असतो, मात्र तरीही तुलसी ग्राहकांची वाट पाहताना दिसली. तर तिला आंबे विकून नवीन मोबाइल खरेदी करायचा आहे. मोबाइल मिळाला तर ती ऑनलाइन अभ्यास करू शकेल. कोरोनामुळे शाळा बंद आहेत. घरात एन्ड्रॉइड मोबाइल फोन नाही. त्यामुळे तुलसी ऑनलाइन अभ्यास करू शकत नाही. गेल्या वर्षापासून तिला शाळेचा अभ्यास बंद आहे.
तुलसीने सांगितलं की, कोरोनामुळे तिच्या वडिलांचं काम सुटलं. त्यामुळे घरावर आर्थिक संकट कोसळलं. त्यामुळे तिला आंबे विकावे लागत आहे. आंबे विकून तिला अन्ड्रॉइड फोन खरेदी करायचा आहे. त्यामुळे ती अभ्यास करू शकेल.
हे ही वाचा-पंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी
तुलसीला अभ्यास करायचा आहे. तिची आई पद्मनी देवीने नकार दिल्यानंतरही तुलसी मोबाइलसाठी पैसे जमा करण्यासाठी आंबे विकत आहे. तुलसी आंबे विकून आलेले पैसे घरातही देते. तिच्या आईचं म्हणणं आहे की, तिला किती सांगितलं तरी ती ऐकत नाही. तिला भविष्यात शिकायचं आहे. मात्र आम्ही गरीब आहोत. कदाचित तिला फार शिकवू शकणार नाही. तुलसी कुमारी जमशेदपूरमधील बगुनाथू भागात राहते. तिच्या आईचं म्हणणं आहे की, जर काही सरकारी मदत मिळाली तर तुलसीला आंबे विकावे लागणार नाही आणि ती अभ्यास करू शकेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.