मुंबई, 01 ऑगस्ट: आजकाल अनेक विद्यार्थ्यांना पैसे कमवण्याची इच्छा असते. यासाठी त्यांना अधिक वेळ वाटही बघ्याची नसते. दहावी किंवा बारावी झाल्यानंतर त्यांना लगेच जॉब हवा असतो. घरची आर्थिक परिस्थिती यामागचं एक प्रमुख कारण असू शकतं. दहावीनंतर हे शक्य आहे. आता तुम्ही बारावी उत्तीर्ण केल्यांनतर काही शॉर्ट टर्म कोर्सेस (Short term courses after 10th) करून नोकरी करू शकता. अर्थात नोकरीत (short term courses for jobs) समोर जाण्यासाठी तुम्हाला पदवीपर्यंत शिक्षण महत्त्वाचं असेल मात्र तुम्ही शिक्षण घेतानाही जॉब करू शकता. बहुतांश विद्यार्थी आणि त्यांचे पालक आता कौशल्यावर आधारित नोकऱ्या किंवा रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची मागणी करत आहेत. 10वी बोर्ड परीक्षेनंतर अनेक डिप्लोमा कोर्सेस करता येतात. त्यांचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्हाला सहज नोकरी मिळू शकते. हॉटेल मॅनेजमेंट आजकाल हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये खूप वाव आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी दहावीनंतर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा करता येतो. त्यामुळे नोकरी मिळणे सोपे होईल आणि भविष्यातही प्रगती होईल. काय नोकरी..काय शिक्षण.. काय करिअर! देशातील ‘या’ शहरांमध्ये तरुणांची लाईफ एकदम ओक्के संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंग संगणकाच्या युगात हा एक उत्तम करिअर पर्याय असू शकतो. या क्षेत्रात संगणक दुरुस्ती आणि नेटवर्किंगशी संबंधित माहिती घेतली जाते. या क्षेत्रात उत्तम करिअरच्या संधी आहेत. अभियांत्रिकी डिप्लोमा अनेक संस्था आणि पॉलिटेक्निक महाविद्यालये 10वी नंतर अभियांत्रिकी पदविका देतात. अभियांत्रिकी पदविका प्रमाणपत्र घेतल्यावर, एखाद्याला अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित मध्यम स्तराची नोकरी सहज मिळू शकते. ITI (औद्योगिक प्रशिक्षण) 10वी बोर्ड परीक्षेनंतर ITI हा देखील एक चांगला पर्याय आहे. इलेक्ट्रीशियन, वेल्डर, फिटर, कारपेंटर, मेकॅनिक, स्टेनो, कॉम्प्युटर असे अनेक विषय आहेत. हा कोर्स करून तुम्ही तुमचे काम सुरू करू शकता. ITI ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची बंपर लॉटरी; ‘या’ नॅशनल कंपनीत भरती
स्टेनोग्राफी आणि टायपिंग
स्टेनोग्राफी आणि टायपिंगचा डिप्लोमा कोर्स 10 वी नंतर करता येतो. न्यायालये आणि इतर अनेक सरकारी कार्यालयांमध्ये अशा रिकाम्या जागा भरत राहतात, ज्यासाठी स्टेनोग्राफीचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.