मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

काय नोकरी..काय शिक्षण.. काय करिअर! देशातील 'या' शहरांमध्ये तरुणांची लाईफ एकदम ओक्के

काय नोकरी..काय शिक्षण.. काय करिअर! देशातील 'या' शहरांमध्ये तरुणांची लाईफ एकदम ओक्के

या टिप्समुळे क्रॅक होईल Exam

या टिप्समुळे क्रॅक होईल Exam

देशातील कोणत्या शहरात करिअर (Top 3 cities in country best for Career) उत्तम होऊ शकतं. असे प्रश्न तुम्हालाही पडेल असतील तर चिंता करू नको आज आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहोत.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 01 ऑगस्ट: देशातील तरुण आणि तरुणी लहान शहरांमधून असू देत किंवा तालुक्यातून किंवा लहान खेड्यापाड्यातून शिक्षण आणि करिअर करण्यासाठी प्रत्येक जण हा शहरांकडेच वळतो. प्रत्येकाला आपलं जीवन चांगलं आणि सुकर व्हावं असंच वाटतं. मात्र नक्की कोणती शहरं शिक्षण आणि इतर गोष्टींसाठी चांगली आहेत. कोणत्या शहरांमध्ये लगेच नोकरी मिळते. देशातील कोणत्या शहरात करिअर (Top 3 cities in country best for Career) उत्तम होऊ शकतं. असे  प्रश्न तुम्हालाही पडेल असतील तर चिंता करू नको आज आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. पुणे पुणे हे करिअरचे केंद्र बनले एक काळ असा होता की पुणे महाराष्ट्रातील शहर होते. पण आज हे शहर मुंबईच्या दोन पावले पुढे सरकत अखंड भारतीय शहर बनले आहे. येथे देश-विदेशातील तरुण आपले करिअर घडवण्यासाठी येतात. पुणे हे नवीन पिढीसाठी करिअरचे केंद्र बनले आहे. विशेषत: ज्या तरुणांना संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करायचे आहे. आजच्या तारखेत, पुणे हे देशातील रोजगार देणारे मुख्य शहर आहे. Success Tips: कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचंय? मग आता लगेच सोडा या वाईट सवयी
केवळ नोकऱ्यांच्या बाबतीतच नव्हे, तर उच्च शिक्षणाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी सध्या पुणे पहिली पसंती आहे. खर्‍या अर्थाने देशाच्या आयटी क्षेत्रासाठी पुणे हे मुख्य शहर आहे. पुण्यातील करिअर वाढीची क्षमता देशातील इतर शहरांपेक्षा 25 ते 30 अधिक आहे. विशेषत: आयटी क्षेत्रासाठी ही शक्यता इतर शहरांच्या तुलनेत 30 ते 35 टक्क्यांनी जास्त आहे. आणखी एक फायदा म्हणजे पुण्यातील आयटी क्षेत्रातील सर्व तरुण व्यावसायिकांना अमेरिका, युरोप किंवा जगातील इतर कोणत्याही शहरात सहज नोकऱ्या मिळू शकतात.
मुंबई पुणे शहरांप्रमाणेच मुंबईतही रोजगार निर्मिती, करिअर आणि शिक्षण हे अगदी जोमात आहे. मुंबईत निरनिराळ्या राज्यातून लोक येऊन इथे रोजगार शोधतात आणि करतात. तसंच इथे शिक्षण आणि नोकरीसाठी उत्तम वातावरण आहे. मुंबई हि देशाची आर्थिक राजधानी तर आहेच मात्र कारवर राजधानी आहे असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. याच मुंबईनं भल्याभल्यांना यशाच्या उंच शिखरावर नेऊन बसवलं आहे. 'तुम्हाला किती पगार हवा? या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी 'या' गोष्टी नक्की करा चेक
दिल्ली
देशाची राजधानी दिल्लीतही क्रॉअरच्या बाबतीत अनेक स्कोप आहे. मुबई हे रोजगार निर्मिती आणि करिअरच्या संधींच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. पण लवकरच दिल्ली ही जागा हिसकावून घेऊ शकते, कारण दिल्लीत नवीन कॉर्पोरेट कार्यालये वेगाने बांधली जात आहेत. नोकऱ्या आणि करिअर घडवण्याच्या बाबतीत दिल्ली चौथ्या क्रमांकावर आणि सुरत पाचव्या क्रमांकावर आहे.
First published:

Tags: Career, Career opportunities, Delhi, Mumbai, Pune

पुढील बातम्या