मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Google मध्ये नोकरी करायची आहे? खुद्द गुगलमधील भारतीय इंजिनिअरनं सांगितला अनुभव; एकदा वाचाच

Google मध्ये नोकरी करायची आहे? खुद्द गुगलमधील भारतीय इंजिनिअरनं सांगितला अनुभव; एकदा वाचाच

आकाश मुखर्जी यांनी Google मधील नोकरी आणि आव्हानं याबाबत काही माहिती दिली आहे.

आकाश मुखर्जी यांनी Google मधील नोकरी आणि आव्हानं याबाबत काही माहिती दिली आहे.

आकाश मुखर्जी यांनी Google मधील नोकरी आणि आव्हानं याबाबत काही माहिती दिली आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

आजकालच्या काळात जॉब करू इच्छिणाऱ्या प्रत्येक उमेदवारांना त्यांच्या करिअरच्या (Career in google) स्वप्नाबद्दल विचारलं असता अनेकांचं एकच स्वप्न समोर येतं. हे स्वप्न म्हणजे Google मध्ये नोकरी (Jobs in Google). Google सारखी जगातील सर्वात मोठी आणि नामांकित कंपनी ही प्रत्येकाला जॉब देऊ शकत नाही. Google मध्ये नोकरी करण्यासाठी अंगात गुण असणं आणि Google च्या मागणीनुसार शिक्षण (Education Required for jobs in google) असणं आवश्यक आहे. मात्र आता गूगलमधील एका इंजिनिअरनं याबाबत माहिती दिली आहे. Google मध्ये काम कसं चालतं याबाबत त्यांनी सांगितलं आहे.

Google मधील सेक्युरिटी इंजिनिअर (Security Engineer) आकाश मुखर्जी यांनी आताच्या Google मधील नोकरी आणि आव्हानं याबाबत तरुण आणि नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना आणि विद्यार्थ्यांना काही माहिती दिली आहे.

Google मध्ये कसं असतं कामाचं स्वरूप?

Google मध्ये इंजिनिअर असलेले आकाश मुखर्जी सांगतात, माझ्या दिवसात बहुतेक टूल्स डिझाइन करणे आणि तयार करणे समाविष्ट आहे, त्यामुळे बरंच कोडिंग आणि डिझाइन डॉक्स करावं लागतं. मी म्हणेन की मी माझा 15% वेळ चालू असलेल्या प्रकल्पांच्या अपडेट्स घेण्यात घालवतो. मी स्वतःला भाग्यवान सजतो की मला एकाच वेळी अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करता येत आहे. यामुळे मला सतत आव्हान आणि काम करण्यास प्रवृत्त होण्यास मदत होते.

हे वाचा - Job Alert: महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये तब्बल 3466 पदांसाठी मेगाभरती

Google मध्ये काम करण्याचा फायदा काय?

गूगलमध्ये काम करण्याचा एक फायदा म्हणजे आपण करत असलेल्या कामाचा एक अब्जाहून अधिक लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. ते मला प्रेरणा देते. मी दररोज काम करत असलेल्या सर्व लोकांचा उल्लेख न करणे अन्यायकारक असेल - माझे सहकारी मी करत असलेल्या कामाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहेत असंही आकाश मुखर्जी सांगतात.

कशी करावी Google मधील मुलाखतीची तयारी?

Google ची मुलाखत प्रक्रिया खरोखर आपल्या मूलभूत ज्ञानाची चाचणी घेते. त्या बिल्डिंग ब्लॉक्सला बळकट करण्याचं काम करा आणि टेक्निकल ज्ञानसह प्रश्नांची उत्तरं द्या. जर तुम्ही प्रश्नांकडे लक्ष दिलं तर तुम्हाला समजेल की बेसिक गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत आणि त्यानुसारच मुलाखतीचा अभ्यास करा.

स्वतःवर विश्वास ठेवा

Google मध्ये नोकरी करत यश संपादन करणारे आकाश मुखर्जी तरुण उमेदवारांना आणि विद्यार्थ्यांना सांगतात,  स्वतःवर विश्वास ठेवा, विशेषत: कठीण काळात आणि अपयशांमध्ये. फक्त अपयशाच्या भीतीवर मात करा आणि त्यातून शिकायला सुरुवात करा. अपयश आपल्याला यशापेक्षा बरेच काही शिकवतं. त्यामुळे हिंमत गमावू नका.

First published:

Tags: Career opportunities, Google, Jobs