मराठी बातम्या /बातम्या /करिअर /वह्या - पुस्तकांसोबत शाळेत न्या मास्क आणि सॅनिटायझर, आई-वडिलांनी अशी घ्यावी मुलांची काळजी

वह्या - पुस्तकांसोबत शाळेत न्या मास्क आणि सॅनिटायझर, आई-वडिलांनी अशी घ्यावी मुलांची काळजी

स्कूल बसमधून किंवा कारमधून जाताना खिडक्या उघड्या ठेवा तसंच जाताना कुठल्याही पृष्ठभागाला हाताने स्पर्श करू नका आणि करावा लागलाच तर लगेच सॅनिटायझरने हात स्वच्छ करा.

स्कूल बसमधून किंवा कारमधून जाताना खिडक्या उघड्या ठेवा तसंच जाताना कुठल्याही पृष्ठभागाला हाताने स्पर्श करू नका आणि करावा लागलाच तर लगेच सॅनिटायझरने हात स्वच्छ करा.

स्कूल बसमधून किंवा कारमधून जाताना खिडक्या उघड्या ठेवा तसंच जाताना कुठल्याही पृष्ठभागाला हाताने स्पर्श करू नका आणि करावा लागलाच तर लगेच सॅनिटायझरने हात स्वच्छ करा.

  मुंबई, 11 ऑगस्ट : कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीची दुसरी लाट आता ओसरते आहे. रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे मार्च 2020 पासून बंद असलेल्या जगभरातील शाळा हळूहळू सुरू (School reopening) व्हायला लागल्या आहेत. अमेरिका (America), ब्रिटन (Britain)मध्येही शाळा सुरू झाल्या असून महाराष्ट्रातही गेल्या महिन्यापासून आठवी ते 12 वी चे वर्ग सुरू (Maharashtra School reopens) झाले आहेत. तसंच 17 ऑगस्ट 2021 पासून राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी असलेल्या भागातील शाळा सुरू करण्यात येणार असल्याचं सरकारने जाहीर केलं आहे. पंजाब, छत्तीसगडमधल्या शाळा सुरू झाल्या असून उत्तरप्रदेश आणि आंध्र प्रदेशात 16 ऑगस्टपासून शाळा सुरू होणार आहेत.

  शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरीही शाळांत जाणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी कोरोना संसर्गापासून बचावासाठी खूप काळजी घेणं आवश्यक आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही काळजीपूर्वक मुलांना शाळेत पाठवण्याचं आवाहन केलं आहे. अमेरिकेतील सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन भारतातील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल रिसर्च आणि शिक्षण मंत्रालयाच्या वतीनेही शाळेत जाणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वं आखून दिली आहेत. त्याबद्दलच आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. दैनिक भास्करने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  आई-बाबांनी मुलांना शाळेत पाठवण्यापूर्वी हे ठेवा लक्षात

  आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्यापूर्वी त्याच्या शरीराचं टेंप्रेचर पहा जर ते जास्त असेल तर त्याला शाळेत पाठवू नका. दुसरी गोष्ट म्हणजे शाळेत पाठवताना त्याचं नाक आणि तोंड मास्कने पूर्णपणे झाकलेलं असेल याची काळजी घ्या. तुमच्या पाल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळायला सांगा. पाल्याला हे सांगा की अगदीच अत्यंत महत्त्वाचं काम असेल तर तोंडावरचा मास्क काढ आणि चुकून पाणी पिताना तो ओला झाला तर तो मास्क टाकून देऊन नवा मास्क लाव. त्यासाठी तुम्हाला त्याच्या स्कूलबॅगमध्ये जादाचे मास्क आणि सॅनिटायझर द्यावे लागतील. तसंच त्याला डबा द्या म्हणजे तो कँटिनमध्ये खायला जाणार नाही. त्याच्या कंपॉस बॉक्समध्ये पेन, पेन्सिल सगळं व्यवस्थित भरून द्या. त्याचबरोबर वेट टिश्यु इतर गरजेच्या वस्तू त्याच्या दप्तरात आवर्जून ठेवा. त्यांना असंही सांगा की शक्यतो पुस्तक किंवा डबा कशाचंच शेअरिंग करू नकोस.

  यंदाची स्कॉलरशिप परीक्षा रद्द, मुंबई मनपाच्या शिक्षण विभागाचा निर्णय

  स्कूल बसमधून किंवा कारमधून जाताना खिडक्या उघड्या ठेवा तसंच जाताना कुठल्याही पृष्ठभागाला हाताने स्पर्श करू नका आणि करावा लागलाच तर लगेच सॅनिटायझरने हात स्वच्छ करा. बसमध्ये मागच्या आणि पुढच्या सीटवर कुणी विद्यार्थी नाही ना हे पहा. बसमध्ये काही खाऊ नका आणि 6 फुटांचं अंतर पाळा. बसमधून उतरल्यावर सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवा, असं मुलांना सांगा.

  मास्क चेहऱ्यावरून काढताना आजूबाजेचे सगळे 6 फुटांच्या अंतरावर आहेत ना हे पाहणं जरूर आहे तसंच मास्क काढण्यापूर्वी आणि नवा मास्क लावल्यानंतर हात सॅनिटाइझ करणं खूपच आवश्यक आहे. तसंच शाळेत असताना जेवढं अधिकवेळा हात सॅनिटाइझ करता येतील किंवा पाण्याने धुता येतील तेवढे धुवा असंही पाल्याला सांगून ठेवा. शाळेतही गरजेव्यतिरिक्त इतर पृष्ठभागांना स्पर्श करू नका आणि केलात तर हात सॅनिटाइझ करा. शाळेतल्या छोट्या गल्ल्या किंवा खूप गर्दी असलेल्या हॉलमध्ये जाऊ नकोस, असं आपल्या पाल्याला सांगून ठेवा.

  श्वास घेण्यास त्रास होत असेल तर आजूबाजूला 6 फुटांवर कुणीही नसताना मास्क काढून पाल्य श्वास घेऊ शकेल पण नंतर लगेच त्याने मास्क लावून हात स्वच्छ करावेत.

  अकरावीची सीईटी न्यायालयाकडून रद्द, दहावीच्या मार्कांआधारे होणार प्रवेश

  शाळेतून घरी आल्यावर ही घ्या काळजी

  घराच्या दारात चपला, बूट काढायला सांगा. तिथंच सॅनिटायझर हातावर घेऊन स्वच्छ करायला सांगा. शक्य असल्यास तिथंच कपडे बदलायला पण सांगा आणि सॅनिटाइझ करूनच त्यांना घरात येऊ द्या.

  पाल्याने वापरलेले मास्क स्वच्छ धुवा. फेकण्यासारखे असतील तर फेकून द्या.

  त्याला अंघोळ करायला सांगा किंवा शक्य नसल्यास हात-पाय धुवायला सांगा.

  पाल्यांना घरातील ज्येष्ठांपर्यंत जाऊ देऊ नका. कारण कोरोनाची बाधा त्यांना लवकर होऊ शकते. जरी कोरोनाबाधित कुणीही घरात नसलं तरीही काळजी घ्यायलाच हवी.

  मुलं घरी आल्यावर पालकांनी त्यांचं दप्तर, डबा सगळं व्यवस्थित स्वच्छ करावं.

  विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! कमी उत्पन्न गटातल्यांसाठी कॉलेजमध्ये 5 टक्के जागा; कुणाला मिळणार फायदा?

  शाळेनी आणि शिक्षकांनी घ्यावी ही काळजी

  शाळेच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी गेटवरच मुलांना सॅनिटायझर देण्यात यावा आणि त्यांच्या शरीराचं तापमान मोजलं जावं अशी व्यवस्था शाळेने करावी. तिथं विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.

  शाळेत येण्याचं गेट आणि बाहेर पडण्याचं गेट हे स्वतंत्र असावं.

  वर्गात हवा खेळती राहील आणि सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाईल याची काळजी घ्यावी. अगदीच आपत्कालीन परिस्थिती आली तर शाळेतच एक क्वारंटाइन रूम तयार असावी.

  स्वच्छतागृहांमध्येही सुरक्षित अंतर पाळलं जाईल याची काळजी शाळेनी घ्यावी.

  आता मुलं शाळेत आली म्हणजे त्यांना स्पोर्ट्स, प्रयोगशाळेतील वर्ग किंवा प्रोजेक्टसाठी एकत्र यावं लागणारंच अशावेळी शक्यतो शिक्षकांनी या हे उपक्रम करणं टाळावं आणि अगदीच टाळणं शक्य नसेल तर त्या वेळी कोरोनासंबंधी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळावेत.

  प्रयोगशाळेत सर्व विद्यार्थी तीच उपकरणं वापरतात त्यामुळे प्रत्येक वेळेला उपकरण वापरलं गेलं की ते सॅनिटाइझ किंवा स्वच्छ करुन करायला हवं. त्यानंतर ते दुसऱ्याला वापरायला द्यावं. जर एखाद्या शिक्षकाची किंवा शाळेतल्या इतर कर्मचाऱ्याची तब्येत बरोबर नसेल तर त्याला थेट घरी पाठवून द्या. विद्यार्थ्याचीही तब्येत ठीक नसेल तर त्यालाही घरी पाठवून द्या. जेणेकरून इतरांना त्यापासून त्रास होणार नाही.

  शाळेतल्या वर्ग खोल्या, स्वच्छतागृह, पार्किंग, आत येण्याचा आणि बाहेर पडण्याचा दरवाजा या सगळ्या ठिकाणी शाळेने कोरोना प्रोटोकॉल पाळण्यासंबंधी माहिती देणारी पोस्टर लावावीत.

  स्वच्छतागृहात हायजीन राखणं अत्यंत महत्त्वाचं असून ते वापरानंतर सॅनिटाइझही केलंच पाहिजे. विद्यार्थी एकमेकांपासून 6 फुटांचं अंतर राखून सर्व व्यवहार करतील याची काळजी शिक्षकांनी घेतलीच पाहिजे.

  First published:

  Tags: Coronavirus, School