नवी दिल्ली, 16 जुन : कोरोनासारख्या महामारीच्या (Corona Virus) या काळात अनेक लोक बेरोजगार (Unemployment) झाले आहेत. तसंच अनेकांना नोकरी शोधण्यात अडचणी येत आहेत. आता SBI नं इंजिनिअर्ससाठी (Engineers jobs) पदभरती जाहीर केली आहे. SBI SCO Recruitment 2021 साठी अप्लाय करण्याची आणि जॉब मिळवण्याची सुर्वणसंधी आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) फायर इंजिनिअर पदं भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवारांची 15 जून 2021 पासून sbi.co.in या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज नोंदणी सुरु झाली आहे. ज्या उमेदवारांनी या पदभरतीसाठी आधीच म्हणजेच 22 डिसेंबर 2020 ते 27 जानेवारी 2021 पर्यंत अप्लाय केलं आहे त्यांनी पुन्हा अप्लाय करण्याची गरज नसणार आहे. भारतीय स्टेट बँकमध्ये फायर इंजिनिअर (Fire Engineers) पदासाठी 16 जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता
अप्लाय करण्यासाठी नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज (NFSC), नागपूर इथून B.E. (फायर), B.Tech. , B.E. (सुरक्षा आणि अग्निशमन अभियांत्रिकी) B.Tech /B.E. (फायर टेक्नॉलॉजी अँड सेफ्टी इंजिनिअरिंग), B.Sc (फायर इंजिनिअरिंग) किंवा मान्यता प्राप्त इन्स्टिट्यूटमधून चार वर्षांचा फायरचा कोर्स करणं आवश्यक आहे.
हे वाचा - चांगली नोकरी मिळवायचीये? मग बायोडेटामध्ये 'या' चुका कधीच करू नका
कशी होईल निवड
अप्लाय करणाऱ्या उमेदवारांपैकी काही उमेदवार शॉर्टलिस्ट करण्यात येतील त्यानंतर शॉर्टलिस्टेड उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल.
असं करा अप्लाय
अप्लाय करण्यासाठी सर्वात आधी sbi.co.in या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. अप्लाय करण्याची शेवटची तारीख 28 जून 2021 आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi, SBI, Sbi bank job