Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

चांगली नोकरी मिळवायचीये? मग बायोडेटामध्ये 'या' चुका कधीच करू नका

चांगली नोकरी मिळवायचीये? मग बायोडेटामध्ये 'या' चुका कधीच करू नका

बायोडेटा (Common mistakes in Resume) तयार करताना होत असलेल्या चुकांबद्दल सांगणार आहोत आणि त्यांचं समाधानही सांगणार आहोत.

बायोडेटा (Common mistakes in Resume) तयार करताना होत असलेल्या चुकांबद्दल सांगणार आहोत आणि त्यांचं समाधानही सांगणार आहोत.

बायोडेटा (Common mistakes in Resume) तयार करताना होत असलेल्या चुकांबद्दल सांगणार आहोत आणि त्यांचं समाधानही सांगणार आहोत.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 16 जून : जगभरात कोणत्याही कंपनीमध्ये नोकरी (Latest Jobs)  मिळवायची असेल तर सर्वात आधी आपल्याला Resume म्हणजेच आपला बायोडेटा (Biodata) कंपनीच्या HR कडे द्यावा लागतो. या बायोडेटामधून आपल्या शिक्षणासंबंधी, आपल्या या आधीच्या अनुभवासंबंधी (Experience in Resume) आणि एकूणच आपल्या व्यक्तिमत्वाबाबत (Personality development) माहिती मिळत असते. म्हणजेच त्या कंपनीत तुम्हाला जॉब मिळणार नाही की नाही यात बायोडेटाची (CV) भूमिका महत्त्वाची असते. पण अनेकदा आपल्या बायोडेटामध्ये अशा काही चुका असतात ज्यामुळे आपल्याला नोकरी मिळू शकत नाही. पण आता अजिबात चिंता करू नका. आम्ही आज तुम्हाला बायोडेटा (Common mistakes in Resume) तयार करताना होत असलेल्या चुकांबद्दल सांगणार आहोत आणि त्यांचं समाधानही सांगणार आहोत.

'या' चुका कधीच करू नका --

बायोडेटा लांबवू नका

बायोडेटा तयार करत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे बायोडेटाची लांबी. अनेकजण बायोडेटा तयार करताना तो ५-६ पानांचा करतात. मात्र असं केल्यामुळे कंपनीच्या HR ला वाचताना त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे नोकरी मिळण्याची शक्यता कमी होते. म्हणूनच बायोडेटा तयार करताना जास्तीत जास्त १-२ पानांचा बनवा. अगदी थोडक्यात आणि मोजक्या शब्दांमध्ये स्वतःला प्रेझेंट करा.

व्याकरणातील चुका टाळा

बहुतांश वेळा आपण बायोडेटा हा इंग्रजी भाषेतूनच तयार करतो. मात्र यामुळे आपल्या वाक्यरचनेत किंवा स्पेलिंग्समध्ये असंख्य चुका होतात. अर्थात आपण या चुका मुद्दाम करत नाही पण या नकळत होतात. म्हणूनच बायोडेटा तयार करत असताना ऑनलाईन स्पेलचेकर्सची (Online spell checkers) मदत घ्या. किंवा तज्ज्ञ व्यक्तींकडून बायोडेटा एकदा तपासून घ्या जेणेकरून चुका होणार नाहीत.

हे वाचा - सरकारी नोकरीच्या शोधात आहात? एका क्लिकमध्ये वाचा या आठवड्यात कुठे अर्ज करता येईल

मुद्द्यापासून दूर जाऊ नका

बायोडेटा तयार करत असताना जे महत्त्वाच आहे तेच लिहा . मूळ मुद्यापासून भरकटून जाऊ नका. तुमचा अनुभव आणि तुमचं शिक्षण हे अगदी कमी शब्दात पण मुद्देसूद लिहा. शक्य असल्यास पॉइंटर्सचा वापर करा. यामुळे कंपनीतील वरिष्ठांना तुमचा बायोडेटा बघण्यास त्रास होणार नाही आणि बायोडेटाही आकर्षक दिसेल.

भडक रंगांचा वापर टाळा

शक्य असल्यास बायोडेटा हा ब्लॅक अँड व्हाईटच असू द्या. यामुळे बायोडेटा प्रोफेशनल दिसण्यास मदत होते. मात्र अगदीच गरज असेल तर बायोडेटामधील पानाचा रंग आणि फॉन्ट्सचा रंग कधीच भडक असू देऊ नका. अगदी फेंट रंगांचा वापर करा. शक्य असल्यास बॉण्ड पेपरवर बायोडेटाचं प्रिंट घ्या.

महत्वाची माहिती चुकीची देऊ नका

अनेकदा बायोडेटावर आपला मोबाईल नंबर, ई-मेल आयडी (Email Id) , घरचा पत्ता आणि शिक्षणासंबंधी आणि अनुभवासंबंधी माहिती दिसली असते. ही माहिती लिहीत असताना चुकीची असणार नाही याची काळजी घेणं महत्वाचं आहे. महिती पूर्ण लिहून झाल्यानंतर एकदा तापसून घ्या. याच माहितीच्या आधारे तुम्हाला जॉब मिळणार की नाही हे अवलंबून असतं. त्यामुळे ही माहिती चुकीची नसेल याची खात्री करून घ्या.

First published:

Tags: Jobs, Mumbai, Rbi latest news