मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

SBI Notification 2022: स्टेट बँकेत 63,840 रुपये महिना पगार, सरकारी नोकरीची मोठी संधी

SBI Notification 2022: स्टेट बँकेत 63,840 रुपये महिना पगार, सरकारी नोकरीची मोठी संधी

आतापासूनच असा Smartly सुरु करा अभ्यास

आतापासूनच असा Smartly सुरु करा अभ्यास

स्टेट बँक ऑफ इंडियानं त्यांची यंदाच्या वर्षातली उमेदवार भरती मोहीम (SBI Notification Released For PO Posts,) जाहीर केली आहे.

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : सरकारी नोकरीचं आकर्षण अनेकांना असतं. सरकारी नोकरीतले फायदे व सुरक्षितता हे त्याचं कारण असतं. सरकारी नोकरीत एकदा लागल्यावर बाहेर पडणाऱ्यांची संख्या थोडी असते; मात्र दर वर्षी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे, तसंच अन्य काही कारणांसाठी सरकारी संस्था भरती करतात. स्टेट बँक ऑफ इंडियानं त्यांची यंदाच्या वर्षातली उमेदवार भरती मोहीम (SBI Notification Released For PO Posts,) जाहीर केली आहे. त्यातून परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची (अर्थात PO) 1673 पदं भरली जाणार आहेत. त्यासाठी PO परीक्षा 2022 (SBI PO Exam 2022) आयोजित केली जाणार आहे. स्टेट बँकेत नोकरी करून महिना 64 हजार रुपये कमावण्याची संधी इच्छुक आणि पात्र उमेवारांनी सोडू नये. अर्जाची तारीख, पात्रता, अधिसूचना व इतर माहितीबाबत (Detailed Information About Exam) जाणून घेऊ या. त्याबद्दल 'झी न्यूज हिंदी'ने सविस्तर वृत्त दिलं आहे. घाई करा! ICG मधील 29,000 रुपये पगाराची नोकरी सोडू नका; उद्या शेवटची तारीख स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) 22 सप्टेंबर 2022 पासून प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या (PO) भरतीसाठी रजिस्ट्रेशन सुरू केलं आहे. पदवीधर विद्यार्थी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच sbi.co.in वर उमेदवार नोंदणी करू शकतात. त्यासाठीची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर ही आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, प्राथमिक परीक्षा 17, 18, 19 आणि 20 डिसेंबरला घेतली जाईल. एसबीआय पीओच्या प्राथमिक परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एसबीआय पीओच्या मुख्य परीक्षेसाठी बोलावलं जाईल. त्यानंतर उमेदवारांची सायकोमेट्रिक चाचणी घेतली जाईल. स्टेट बँक यंदा 1673 रिक्त जागा भरत आहे. एसबीआय पीओ या परीक्षेला अर्ज करण्‍यासाठी उमेदवार पदवीधर असायला हवा आणि त्याचं वय 30 वर्षं किंवा त्यापेक्षा कमी असावं. केंद्र सरकारच्या नियमांनुसार राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. स्टेट बँकेच्या नोकरीत पगार उत्तम असेल. जवळपास 64 हजार रुपये मासिक पगार मिळू शकतो. नोकरीचा पहिला दिवस; नक्की कसं वागावं, काय करावं, कसं बोलावं? तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एका क्लिकवर स्टेट बँकेने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 1673 पदांवर नियुक्ती करण्यासाठी पात्र उमेदवार निवडले जाणार आहेत. यापैकी 648 रिक्त जागा राखीव नाहीत. 464 जागा ओबीसी, 270 जागा एससी, 131 जागा एसटी आणि 160 जागा EWS प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी राखीव आहेत. स्टेट बँकेसाठी अर्ज करताना उमेदवारांना आधी स्वतःची नोंदणी करावी लागेल. त्यानंतर देण्यात आलेला नोंदणी क्रमांक आणि पासवर्डद्वारे लॉग इन करून उमेदवार एसबीआय पीओ पदासाठी परीक्षेचा अर्ज भरू शकतील. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने 750 रुपयांचं अर्ज शुल्क भरावं लागेल. एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना हे शुल्क भरावं लागणार नाही. एसबीआय पीओ या पदासाठी उमेदवारांची भरती प्रक्रिया 22 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. उमेदवार 12 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करू शकतील.

First published:

Tags: Bank exam, Job, SBI

पुढील बातम्या