नवी दिल्ली, 09 जून: देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेमुळं बिकट परिस्थिती निर्माण झाली. ही लाट आता काहीशी ओसरताना दिसत आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे सर्व क्षेत्रांना दणका बसला आहे. कोरोनाचा कहर सुरु होताच शासनाने लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लावण्यास सुरुवात केली. यामुळे अनेकांचे रोजगार अडचणीत आले. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या तर उच्चशिक्षित युवकांसाठी रोजगार (Employment) संधी काहीशा कमी झाल्या. परिणामी बेरोजगारीचे प्रमाण काही अंशी वाढले आहे.
अशा परिस्थितीत अनेक युवक शासकीय तसेच खासगी नोकरीसाठी प्रयत्नशील आहेत. अशा युवकांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे. राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर्स लिमिटेडने (RCFL) ऑपरेटर ग्रेड (केमिकल) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या पदाकरिता अर्ज करण्याची अंतिम मुदत 21 जून 2021 आहे. रोजगाराच्या शोधात असलेल्या उच्च शिक्षित युवकांसाठी ही एक सुवर्णसंधी म्हणता येईल.
हे वाचा-इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांसाठी 280 जागांवर भरती, लवकर संपतेय अर्ज करण्याची मुदत
राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर्स लिमिटेडने ऑपरेटर ग्रेड (केमिकल) या पदासाठी भरतीबाबत एक अधिसूचना (Notification) जारी केली आहे. त्यानुसार, या पदासाठी इच्छुक उमेदवार आरसीएफएलच्या www.rcfld.com या अधिकृत वेबसाइटवरुन अर्ज करु शकतात. 50 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
या पदासाठी राबवली जाणार भरती प्रक्रिया- ऑपरेटर ग्रेड (केमिकल)
एकूण पदे -50
आवश्यक शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एस्ससी ही पदवी घेतलेली असावी. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेबाबत अधिक माहिती घेण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पाहावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
या पदासाठी आवश्यक वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छूक उमेदवाराचे वय 36 वर्षांपेक्षा अधिक नसावे. कमाल वयोमर्यादेत ओबीसी (OBC) वर्गातील उमेदवारांना 3 वर्षे आणि एससी (SC) आणि एसटी (ST) वर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
हे वाचा-तरुण लेखकांसाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; 3 लाखांची स्कॉलरशिप जाहीर
अर्जासाठी शुल्क
खुला गट आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांकरिता अर्ज शुल्क 700 रुपये आहे. एससी आणि एसटी वर्गातील उमेदवारांकरिता कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही.
या गोष्टी ठेवा लक्षात
- ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास सुरुवात – 7 जून 2021
- ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत – 21 जून 2021
- अधिकृत वेबसाइट – www.rcfltd.com
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.