मराठी बातम्या /बातम्या /करिअर /रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरीची संधी; या पदासाठी लवकरच नोकरभरती, असा करा अर्ज

रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरीची संधी; या पदासाठी लवकरच नोकरभरती, असा करा अर्ज

फाईल फोटो

फाईल फोटो

रिझर्व्ह बँकही काही पदांसाठी भरती सुरू करणार असल्याचं समजतंय. असिस्टंटच्या पदासाठी ही भरती होईल.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई 16 मार्च : अनेक सरकारी संस्थांमध्ये आता पदभरती सुरू आहे. रिझर्व्ह बँकही काही पदांसाठी भरती सुरू करणार असल्याचं समजतंय. असिस्टंटच्या पदासाठी ही भरती होईल. लवकरच त्यासंदर्भात आरबीआयकडून सूचना जाहीर होण्याची शक्यता आहे. या पदासाठीचे पात्रता निकष, नोंदणी व निवड प्रक्रियेबाबत जाणून घेऊया.

  'जागरण जोश'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट पदासाठी उमेदवार भरती जाहीर होण्याची शक्यता आहे. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर (opportunities.rbi.org.in) त्याची अधिसूचना लवकरच जाहीर होईल. मार्च किंवा एप्रिल 2023मध्ये ही अधिसूचना जाहीर होऊ शकते. ऑनलाइन परीक्षा व त्यानंतर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट घेऊन उमेदवारांची निवड केली जाईल. नोकरभरतीची अधिसूचना आल्यावर उमेदवार वेबसाइटवर परीक्षेच्या तारखा पाहू शकतात.

  10वी पास आहात ना? मग ही सुवर्णसंधी सोडूच नका; भारतीय पोस्टात सरकारी नोकरी; करा अप्लाय

  पात्रता निकष

  असिस्टंट पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे पदवी असावी लागेल. त्यात सरासरी 50 टक्के गुण असणं गरजेचं आहे. कम्प्युटरचं, वर्ड अ‍ॅप्लिकेशनचं ज्ञानही असणं गरजेचं आहे. उमेदवारांचं किमान वय 20 वर्षं, तर कमाल वयोमर्यादा 28 वर्षं इतकी असेल. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पूर्वपरीक्षेसाठी बोलावलं जाईल. त्यानंतर असिस्टंट पदासाठीची मुख्य परीक्षा पार पडेल. पूर्वपरीक्षेमध्ये 100 मार्कांसाठी 100 प्रश्न असतील, तर मुख्य परीक्षेत 200 मार्कांसाठी 200 प्रश्नांची उत्तरं उमेदवारांना द्यावी लागतील. या दोन्ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होतील. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लँग्वेज प्रोफिशिअन्सी टेस्ट (LPT) द्यावी लागेल.

  नोकरीसाठी कसा अर्ज कराल?

  - आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटला (opportunities.rbi.org.in) भेट द्या.

  - करंट व्हेकन्सीज या पर्यायावर क्लिक करून मग व्हेकन्सीज हा पर्याय निवडा.

  - रिक्रूटमेंट फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट या पर्यायावर जा.

  - नोंदणी करा. त्यानंतर फोटो अपलोड करा. सहीचा नमुना अपलोड करा.

  - सूचनांनुसार अर्ज भरा.

  - प्रीव्ह्यू बटणावर क्लिक करून भरलेला अर्ज पुन्हा एकदा तपासा.

  - त्यानंतर फायनल सबमिट या बटणावर क्लिक करा.

  रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षीही 950 जागांसाठी नोकरभरती जाहीर केली होती. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही विभागांतल्या शाखांमध्ये ही नोकरभरती झाली. त्यासाठी फेब्रुवारी 2022मध्ये नोकरभरतीची अधिसूचना आरबीआयने जाहीर केली व त्यानंतर अर्ज स्वीकृती झाली. यंदाही याच पद्धतीनं आरबीआयमध्ये नोकरभरती केली जाऊ शकते. तसंच मागच्या वर्षीइतक्याच जागांसाठी यंदा नोकरभरती होईल असा अंदाज आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही.

  First published:

  Tags: Job Alert, Rbi