मुंबई, 02 फेब्रुवारी: High Court Translator Recruitment 2020: उच्च न्यायालयात नोकरी करण्याची संधी इच्छुक उमेदवारांना मिळणार आहे. उच्च न्यायालयात ट्रान्सलेटर म्हणून जागा असल्यानं त्यासाठी भरती करण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 10 फेब्रुवारीपासून या पदांसाठी अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन स्वरूपात हे अर्ज तुम्ही भरू शकता. या भरतीची प्रक्रिया अर्ज भरण्याची अंतिम तारीख आणि इतर अपडेट्स जाणून घ्या सविस्तर
ट्रान्सलेटर या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 05 मार्च आहे. https://hcraj.nic.in/hcraj या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. राजस्थान उच्च न्यायालयात ट्रान्सलेटर पदांसाठी जागा निघाली असून तिथे सध्या भरती सुरू आहे. 10 फेब्रुवारीपासून हा अर्ज ऑनलाईन भरता येणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएट असणाऱ्या किंवा करणारे तरुण या पदांसाठी अर्ज भरू शकतात.
एकूण पदांची संख्या- 15 जागा रिक्त
अर्जदाराचं वय 18 ते 40 वर्षांपर्यंत उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरू शकतात.
जनरल, ओबीसी, ईडब्लूएससाठी परीक्षा शुल्क 500 रुपये प्रतिउमेदवार असणार आहे. तर SC/ST साठी 350 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे.
कसा करावा अर्ज?
इच्छुक उमेदवारानं https://hcraj.nic.in/hcraj या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर रजिस्ट्रेशन करून आपली माहिती भरावी. त्यानंतर उमेदवारानं अर्जासाठी अप्लाय करावं. त्यानंतर माहिती भरून परीक्षा शुल्क भरावं. हे झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन एक रिसिट मिळेल ती pdf डाऊनलोड करून घ्यावी.
हेही वाचा-कॉन्स्टेबलच्या 900हून अधिक जागांसाठी भरती, असा करा अर्ज
हेही वाचा-फक्त डिग्री असून आता चालणार नाही! नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक आहेत 5 Skills
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.