मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

फक्त डिग्री असून आता चालणार नाही! नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक आहेत 5 Skills

फक्त डिग्री असून आता चालणार नाही! नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक आहेत 5 Skills

 शिक्षण पूर्ण झालं की नोकरी लागली असा जमाना आता राहिला नाही. त्यामुळे शिक्षणाव्यतिरीक्तही इतर काही खास कौशल्य आपल्याला अवगत करणं शिक्षणासोबत आवश्यक असतं.

शिक्षण पूर्ण झालं की नोकरी लागली असा जमाना आता राहिला नाही. त्यामुळे शिक्षणाव्यतिरीक्तही इतर काही खास कौशल्य आपल्याला अवगत करणं शिक्षणासोबत आवश्यक असतं.

शिक्षण पूर्ण झालं की नोकरी लागली असा जमाना आता राहिला नाही. त्यामुळे शिक्षणाव्यतिरीक्तही इतर काही खास कौशल्य आपल्याला अवगत करणं शिक्षणासोबत आवश्यक असतं.

  • Published by:  Akshay Shitole

मुंबई, 31 जानेवारी: शिक्षण पूर्ण झालं की नोकरी लागली असा जमाना आता राहिला नाही. त्यामुळे शिक्षणाव्यतिरीक्तही इतर काही खास कौशल्य आपल्याला अवगत करणं शिक्षणासोबत आवश्यक असतं. या कलागुणांच्या आधारावर आपण चारचौघांमध्ये स्वत:ला वेगळं सिद्ध करू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर बघा जेव्हा दोन समान गुण असणारे उमेदवार मुलाखत अथवा एका नोकरीसाठी अर्ज करतात तेव्हा एकाची निवड होते दुसऱ्याची नाही. याचं कारण आपण कधी शोधलं आहे का? तर आपल्या इतक्याच गोष्टी त्या उमेदवारालाही येत असतात मात्र त्या अधिक वेगळ्या आणि चांगल्या पद्घतीनं मांडण्याचं कसब त्याच्या हाती असतं. त्यामुळे आपणही काही गोष्टी आत्मसात कऱणं गरजेचं असतं. आज आम्ही तुम्हाला यासाठी खास मदत करणार आहोत.

1.संवाद कौशल्य

संवाद कौशल्य हे असं कौशल्य आहे जी तुम्हाला आयुष्यभराची पुंजी मिळवून देऊ शकतं. यामध्ये अगदी तुमच्या जोडीदारापासून ते बॉसपर्यंत सगळ्या ठिकाणी आपल्या बोलण्याचा कस लागत असतो. त्यामुळे काळ, वेळ, प्रसंग पाहून कशा पद्धतीनं गोष्टी मांडायच्या. योग्य अयोग्य काय आणि कशा पद्धतीनं आपलं म्हणणं समोरच्याला पटवून द्यायचं हे ओळखता आलं पाहिजे. यासोबत प्रत्येक गोष्टीत वाद न होता तो सुसंवाद कसा घडेल याची काळजी घेण्यासाठी वारंवार कसरतही करावी लागते. चांगल बोलता येणं किंवा संवाद साधता येणं हे आपल्या नोकरी किंवा व्यवसायातील सर्वात महत्त्वाचं skill आहे.

2.क्रिएटिव्ह असणं आवश्यक

नोकरीच्या ठिकाणी आपलं म्हणणं किंवा काम इतरांपेक्षा अधिक चांगलं आणि वेगळ्या पद्धतीनं कसं मांडता येईल याचा विचार करणारा उमेदवार कायम सरस ठरतो. त्यासाठी थोडा वेगळा विचार आवश्यक असतो.

3.डिजिटल स्कील्स

कंप्युटर, मोबाईल आणि इतर तंत्रज्ञानाची प्राथमिक माहिती असणं आवश्यक असतं त्यातही आपल्याला संगणकातील इतर स्कील्स येत असतील तर आपल्याला पहिलं प्राधान्य दिलं जातं.

4.इमोशनल इंटेलिजेंस

चांगल्या करिअरसाठी भावनिक बुद्धिमत्ता असणे आपल्यासाठी महत्वाचे आहे. कार्यालयातील लोकांशी कसे वागावे हे आपणास माहित असले पाहिजे. आपण अस्वस्थ आहात की आपण रागावलेले आहात, परंतु ऑफिसमध्ये आपल्याला या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. सहाकाऱ्यांसोबत कामात सहाकार्याची भावना ठेवणं आपल्या आणि कंपनीच्या कायमच हिताचं असतं.

5. शिस्त आणि नियमांचं पालन करणं

कामाच्या ठिकाणी कंपनीचे नियम आहेत त्याचा आपल्याकडून भंग होणार नाही याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. वेळेत येणं आणि काम आटपून घरी जाणं यासोबतच शिस्तप्रिय वातावरणात काम नेटानं पूर्ण केल्यास कामाचा ताण येत नाही. नोकरीच्या ठिकाणी कामाचे नियम मोडल्यानं त्याचा परिणाम आपल्या कामावर आणि व्यक्तीमत्त्वावर होत असतो.

First published: