कॉन्स्टेबलच्या 900हून अधिक जागांसाठी भरती, असा करा अर्ज

कॉन्स्टेबलच्या 900हून अधिक जागांसाठी भरती, असा करा अर्ज

APSSB Recruitment 2020: दहावी पास असणाऱ्या युवकांसाठी नोकरीची खास संधी आहे.

  • Share this:

मुंबई, 01 फेब्रुवारी : APSSB Recruitment 2020: दहावी पास असणाऱ्या युवकांसाठी नोकरीची खास संधी आहे. अरुणाचल प्रदेश कर्मचारी चयन बोर्डानं भरती करण्याची घोषणा जारी केली आहे. GD कॉन्स्टेबल, IRBn कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, फॉरेस्ट, फॉरेस्ट गार्ड, मिनरल गार्ड, ड्रायवर आणि फायरमॅनसारख्या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. पर्यावरण व वन विभाग, पोलिस महासंचालक, अग्निशमन व आपत्कालीन सेवा आणि प्राणीशास्त्र व खाण विभागातील या पदांवर एकूण 944 रिक्त आहेत. पदांवरील अर्जाशी संबंधित संपूर्ण माहितीसाठी, उमेदवारांनी कसा अर्ज भरायचा आहे जाणून घ्या.

एकूण रिक्त जागा आणि शैक्षणिक पात्रता

एकूण जागा 944

फॉरेस्टर - 159 जागा, 12वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

हेड कॉन्स्टेबल (आरटी- 17 जागा, PCM सोबत 10 वी-12 उत्तीर्ण असणं गरजेचं

हेड कॉन्स्टेबल (टेलिकॉम) - 195 जागा- 10वी उत्तीर्ण

हेड कॉन्स्टेबल (टेलिकॉम) तिरुप - 12 जागा, 10वी उत्तीर्ण

हेड कॉन्स्टेबल (टेलिकॉम) लँडिंग -15 जागा, 10वी उत्तीर्ण

हेड कॉन्स्टेबल (टेलिकॉम) चांगलंग -21 जागा- 10वी उत्तीर्ण

फायरमॅन ग्रेड सी - 21 जागा - 10वी उत्तीर्ण

हेही वाचा-10 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी, रेल्वेमध्ये 400 जागांसाठी भरती

कॉन्स्टेबल (जीडी) सिव्हिल पोलिस नर - 225 जागा , 10वी उत्तीर्ण

कॉन्स्टेबल (जीडी) सिव्हिल पोलिस महिला - 172 जागा, 10वी उत्तीर्ण

कॉन्स्टेबल आयआरबीएन - 29 जागा, 10वी उत्तीर्ण

वनरक्षक -10 जागा, 10वी उत्तीर्ण

खनिज रक्षक - 05 जागा , 10वी उत्तीर्ण

एच / सी चालक - 40 जागा, 10वी उत्तीर्ण आणि चांगली गाडी चालवता येणं आवश्यक, लायसण असणं गरजेचं आहे.

कॉन्स्टेबल चालक (सिव्हिल पोलिस)- 23 जागा, 10वी उत्तीर्ण

कोण करू शकतं अर्ज आणि कसा

वयवर्ष 17 ते 21 वयोगटातील उमेदवार कॉन्स्टेबलच्या रिक्त जागांसाठी तर हेड कॉन्स्टेबल आणि फायरमॅन पदांसाठी 18 ते 25 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारानं 7 मार्चपर्यंत www.appsb.in या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. APST उमेदवारासाठी फॉर्म शुल्क 100 भरावे लागणार आहे. 28 फेब्रुवारी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत होती मात्र सरकारकडून वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा-फक्त डिग्री असून आता चालणार नाही! नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक आहेत 5 Skills

First published: February 1, 2020, 9:58 AM IST

ताज्या बातम्या