Home /News /career /

परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी CBSE तर्फे मोठी पावलं; प्रत्येक हॉल तिकिटावर राहणार QR Code

परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी CBSE तर्फे मोठी पावलं; प्रत्येक हॉल तिकिटावर राहणार QR Code

हॉल तिकिटावर राहणार QR Code

हॉल तिकिटावर राहणार QR Code

CBSE टर्म 2 ची परीक्षा पुढील मंगळवारपासून म्हणजेच 26 एप्रिल 2022 पासून सुरू होणार आहे. तसंच बोर्डातर्फे परीक्षेसाठीची जोरदार तयारी सुरु आहे.

    मुंबई, 20 एप्रिल: CBSE बोर्डाची परीक्षा (CBSE Term 2 Exam 2022) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाते. लाखो विद्यार्थी CBSE बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेला (CBSE Term 2 Exam) बसतात. यावर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे CBSC बोर्डाची परीक्षा (CBSE 10th 12th Exam) दोन टर्ममध्ये घेतली जात आहे.  CBSE टर्म 2 ची परीक्षा पुढील मंगळवारपासून म्हणजेच 26 एप्रिल 2022 पासून सुरू होणार आहे. तसंच बोर्डातर्फे परीक्षेसाठीची जोरदार तयारी सुरु आहे. सामान्यतः CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपत्रे बोर्ड परीक्षा सुरू होण्याच्या 1 आठवडा आधी जारी केली जातात. मात्र यंदा परीक्षेच्या काही दिवसांआधीही विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळालेले नाहीत. बोर्डाची परीक्षा टर्म 1 प्रमाणे होम सेंटरवर होईल की इतर शाळांमध्ये जाऊन परीक्षा द्यावी लागेल हेही त्यांना माहीत नाही. कोरोनाचा वाढत प्रदुर्भाव बघता CBSE कडून अजूनही कोणता ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र यंदा परीक्षेमध्ये कॉपी होऊ नये म्हणून CBSE बोर्डाकडून मोठी पावलं उचलण्यात येत आहेत. CBSE Exam एकतर रद्द करा नाहीतर....; परीक्षेला अवघे काही दिवस असताना विद्यार्थ्यांची मागणी CBSE बोर्डाच्या टर्म 2 च्या परीक्षेसंदर्भात असे काही अपडेट्स आहेत, ज्यांची इयत्ता 10वी आणि 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. तसंच बोर्डाकडून CBSE बोर्ड परीक्षेच्या प्रवेशपत्रावर QR कोड (QR code on hall tickets of CBSE Exams) असण्याची शक्यता आहे. या क्यूआर कोडच्या माध्यमातून बनावट विद्यार्थ्यांना ओळखून त्यांना परीक्षा देण्यापासून रोखण्यात मदत होणार आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला बनावट प्रवेशपत्राद्वारे दुसऱ्याच्या रोल नंबरवर परीक्षा देता येणार नाही. CBSE बोर्डाच्या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्याची तसेच त्याच्या पालकांची आणि शाळेच्या मुख्याध्यापकांची स्वाक्षरी असणे अनिवार्य आहे. प्रवेशपत्राशिवाय विद्यार्थ्यांना CBSE बोर्डाची परीक्षा देण्याची संधी मिळणार नाही. CBSE Exam Tips: परीक्षेत 90%हून अधिक मार्क्स हवे असतील Mock Tests देऊन बघाच परीक्षेसाठीची नियमावली परीक्षा हॉलमध्ये 12 ऐवजी 18 विद्यार्थ्यांना एका वर्गात बसण्याची परवानगी असेल. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क आणि तापमान मोजण्यासारख्या सूचना पूर्वीप्रमाणेच याही परीक्षेत असणारा आहेत. टर्म 2 प्रश्नपत्रिका कस्टोडियन्सना पाठवल्या जातील तसंच जिओ टॅगिंग आवश्यक असेल. दहावी आणि बारावीची CBSE टर्म 2 परीक्षा दोन तासांची असेल. सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना सकाळी 9.30 पर्यंत परीक्षा केंद्रावर हजर राहावे लागेल. तसेच विद्यार्थ्यांना 10.00 नंतर प्रवेश दिला जाणार नाही.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Board Exam, CBSE 10th, CBSE 12th, Education, Exam Fever 2022

    पुढील बातम्या