CBSE Exam एकतर रद्द करा नाहीतर....; परीक्षेला अवघे काही दिवस असताना विद्यार्थ्यांची मागणी
CBSE Exam एकतर रद्द करा नाहीतर....; परीक्षेला अवघे काही दिवस असताना विद्यार्थ्यांची मागणी
परत परीक्षा रद्द करण्याची मागणी
मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थी गेल्या दोन वर्षांप्रमाणे परत परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आहेत.
मुंबई, 18 एप्रिल: CBSE बोर्डाची टर्म दोनची परीक्षा (CBSE Board Exam 2022) ही एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होणार आहे. यासाठी सर्व विद्यार्थ्यांना हॉल तिकीटही (Hall Ticket CBSE term 2 exam) देण्यात आले आहेत. ही परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. यासाठीची नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. मात्र कोरोना संपूर्णपणे नाहीसा झाला असं वाटत असताना पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थी गेल्या दोन वर्षांप्रमाणे परत परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आहेत.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बोर्डाने गेल्या वर्षी दहावीची परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्याची घोषणा केली होती. पहिली टर्म एमसीक्यू आधारित परीक्षा (CBSE students seeking for MCQ exam) नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पूर्ण झाली आहे. टर्म-1 मधील मुलांची कामगिरीही प्रसिद्ध झाली आहे. आता टर्म-2 च्या परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून होणार आहेत. मात्र त्यापूर्वीच कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.
CBSE Exam Tips: परीक्षेत 90%हून अधिक मार्क्स हवे असतील Mock Tests देऊन बघाच
विशेषतः शाळकरी मुलांनाही याची लागण होत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांसह पालकांनाही परीक्षांची चिंता सतावत आहे. टर्म-2 च्या परीक्षा MCQ प्रश्नांवर आधारित घेण्याची मागणी पालक आणि विद्यार्थी ट्विटरवरून बोर्डाकडे करत आहेत. तसंच पालकही कोरोना रुग्ण वाढत आहेत आणि म्हणूनच परीक्षा होम सेंटरवर व्हावी अशी मागणी करत आहेत.
CBSE ने सांगितले होते की जर सामान्य वर्णनात्मक परीक्षेसाठी परिस्थिती अनुकूल नसेल, तर टर्म 2 च्या शेवटी देखील 90 मिनिटांची MCQ आधारित चाचणी घेतली जाईल. त्याच वेळी, विद्यार्थ्यांना सीबीएसई टर्म-1 आणि टर्म-2 च्या वेटेजबद्दल स्पष्टता हवी आहे. एका विद्यार्थ्याने ट्विटरवर लिहिले की, आता कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत, अशा परिस्थितीत टर्म-2 ही MCQ आधारित परीक्षा करण्याची योग्य वेळ आहे.
MPSC Tips: उमेदवारांनो MPSC परीक्षा घरबसल्या करू शकता Crack; असा करा अभ्यास
पालकांची वेगळीच मागणी
कोविड-19 सुरक्षेशी संबंधित सर्व प्रोटोकॉल त्यांच्या मुलीच्या शाळेत पाळले जात आहेत. वेगवेगळ्या शाळांमध्ये ज्याप्रकारे कोरोनाची प्रकरणे समोर येत आहेत, त्यामुळे विद्यार्थी ज्या शाळेत परीक्षादेतील त्या शाळेत प्रोटोकॉल पाळला जाईल की नाही, अशी भीती वाटत आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांची परीक्षा होम सेंटरमध्ये व्हावी असं काही पालकांचं म्हणणं आहे.
Published by:Atharva Mahankal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.