मुंबई, 17 एप्रिल: देशभरात लवकरच CBSE बोर्डाच्या टर्म दोनच्या परीक्षांना
(CBSE Term 2 Exam 2022) सुरुवात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी जोमानं अभ्यासा लागले आहेत. विद्यार्थी संपूर्ण मेहनतीनं अभ्यास करत आहेत. कोणी नोट्स बनवून तर कोणी टाइम टेबल
(Time Table of Board exams) बनवून अभ्यास करत आहेत. मात्र परीक्षेत चांगले मार्क्स
(How to get good marks in Board Exams) मिळवायचे असतील तर आजकाल मॉक टेस्टही महत्त्वाच्या आहेत. मात्र अनेक विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती नसतं. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मॉक टेस्ट
(What is Mock test) म्हणजे नक्की काय? आणि याचा परीक्षेत चांगले मार्क्स
(How to get good marks by mock test) मिळवण्यासाठी कसा फायदा होऊ शकतो हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
बहुतेक करिअर तज्ञ कोणत्याही परीक्षेपूर्वी मॉक टेस्ट करण्याचा सल्ला देतात. वास्तविक, कोणत्याही परीक्षेला बसण्यासाठी परीक्षेचा अभ्यासक्रम आणि योग्य पुस्तकांची माहितीसह परीक्षेचा पॅटर्न जाणून घेणं आवश्यक असतं. परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात हे माहीत असेल तर त्याची तयारी करणं सोपी जातं. म्हणूनच मॉक टेस्ट देणं महत्त्वाचं असतं.
CBSE Exam 2022: होम सेंटरवरच व्हावी बोर्डाची परीक्षा; पालक का करताहेत अशी मागणी?
Mock Test म्हणजे नक्की काय?
मॉक टेस्ट म्हणजेच तुम्ही देणार आहेत त्या परीक्षांसारखीच एक परीक्षा. मॉक टेस्ट ऑनलाईन पद्धतीनं घेतल्या जातात. या टेस्टमधून विद्यार्थ्यांना खऱ्या परीक्षेत उत्तरं कशी लिहावीत, कोणत्या उत्तराला किती वेळ द्यावा याबद्दल अंदाज येतो. तसंच ही परीक्षा संपूर्णतः बोर्डाच्या अभ्यासक्रमावर असते. तसंच विविध विषयांची वेगळी मॉक टेस्टही असते.
Mock Test ठरते फायदेशीर
टाइम मॅनेजमेंटचा येतो अंदाज
मॉक टेस्टला तुमच्या मुख्य परीक्षेप्रमाणे सोडवणं महत्त्वाचं आहे. मुख्य परीक्षेसाठी जितक्या वेळेत मिळेल तितक्याच वेळेत सोडवा. यामुळे परीक्षेदरम्यान टाईम मॅनेजमेंट कामात येऊ शकतं. तसंच कोणत्या प्रश्नाला किती वेळ देता येईल याचाही अंदाज येतो.
प्रश्नांची येईल कल्पना
संपूर्ण मॉक टेस्ट या तुमच्या अभ्यासक्रमावर आणि तुमच्या विषयांवरच अवलंबून असणार आहेत त्यामुळे मुख्य परीक्षेत तुम्हाला प्रश्न नवीन वाटणार नाहीत. यावरून परीक्षेचा नमुना आणि परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांच्या प्रकाराची उत्तम कल्पना येईल. त्यामुळे परीक्षेत सर्व प्रश्नांची उत्तरं बरोबर लिहून तुम्ही चांगले मार्क्स मिळवू शकता.
CBSE बोर्डाचा दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत मोठा निर्णय
परीक्षेचं टेन्शन होतं कमी
कोणत्याही परीक्षेच्या अंतिम तयारीसाठी मॉक टेस्ट देणं आवश्यक आहे. परीक्षेपूर्वी प्रश्नांचा सराव करून परीक्षेचा ताण कमी होतो. मॉक टेस्टमुळे आत्मविश्वास वाढतो. तसंच सर्व प्रश्न बघितले असल्यामुळे उत्तरं लिहिण्यास अडचण येत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.