मराठी बातम्या /बातम्या /करिअर /महिलांनो, देशसेवेसाठी NDA जॉईन करायचंय? मग पात्रतेपासून शिक्षणापर्यंत इथे मिळेल संपूर्ण माहिती

महिलांनो, देशसेवेसाठी NDA जॉईन करायचंय? मग पात्रतेपासून शिक्षणापर्यंत इथे मिळेल संपूर्ण माहिती

येणाऱ्या वर्षीच्या NDA परीक्षांसाठी रजिस्ग्ट्रेशन सुरु झालं आहे.

येणाऱ्या वर्षीच्या NDA परीक्षांसाठी रजिस्ग्ट्रेशन सुरु झालं आहे.

NDA साठी नक्की काय पात्रता लागणार याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

मुंबई, 26 डिसेंबर: काही महिन्यांपूर्वी देशात एक ऐकतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. देशसेवेसाठी रुजू होण्यासाठी घेण्यात येणाऱ्या NDA परीक्षेसाठी (NDA for Women) आता पुरूषांसोबतच महिलाही भरती परीक्षा देऊ शकणार असा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयामागे अनेक प्रश्न होते. नक्की कोणत्या महिलांना संधी मिळणार? त्यासाठी नक्की कोणत्या प्रकारचं आणि कोणत्या शाखेतील शिक्षण आवश्यक (Education Qualification for NDA Exams) असणार? तसंच शारीरिक पात्रता (Physical Eligibility for NDA) काय असणार? मात्र हळूहळू या सर्व प्रश्नांची उत्तरं समोर आहेत. तसंच येत्या वर्षात NDA ची परीक्षा (UPSC NDA Exam 2022) घेण्यात येणार आहे. त्यासाठी नक्की काय पात्रता लागणार याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

UPSC NDA लेखी परीक्षा (NDA written exam) उत्तीर्ण होण्यासोबतच शारीरिक मापदंडांची पूर्तता करणे देखील आवश्यक आहे. UPSC ने NDA मध्ये सामील होण्यासाठी इच्छुक महिला उमेदवारांसाठी तपशीलवार शारीरिक निकष देखील जारी केले आहेत. त्यामुळे उमेदवारांना अभ्यासासोबतच शारीरिक व्यायाम करून शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्याचा सल्ला दिला जातो. येणाऱ्या वर्षीच्या NDA परीक्षांसाठी रजिस्ग्ट्रेशन सुरु झालं आहे.

Government Jobs: तोफखाना केंद्र नाशिक इथे तब्बल 107 जागांसाठी Vacancy

UPSC NDA (1) 2022 साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया (How to register for UPSC NDA 2022) कालपासून सुरू झाली आहे. यासाठी 11 जानेवारी 2022 पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. UPSC वेबसाइट upsconline.nic.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. UPSC NDA परीक्षेद्वारे एकूण 400 पदे भरली जातील. यामध्ये 35 जागा महिला उमेदवारांसाठी आहेत. ही परीक्षा 10 एप्रिल रोजी होणार आहे.

या परीक्षेसाठी ही असेल पात्रता

शारीरिक पात्रता (Physical Eligibility)

एनडीएच्या माध्यमातून भारतीय सैन्यात सामील होऊ इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांची उंची किमान १५२ सेमी असावी. तथापि, ईशान्य क्षेत्र, गढवाल आणि कुमाऊंमधील उमेदवारांसाठी, उंची किमान 148 सेमी असावी. त्याच वेळी, फ्लाइंग शाखेत जाण्यासाठी, उंची किमान 163 सेंटीमीटर असावी.

UPSC क्रॅक करून तुम्हीही होऊ शकता IAS ऑफिसर; अशा पद्धतीनं आताच सुरु करा अभ्यास

शैक्षणिक पात्रता (Educational Eligibility)

शालेय शिक्षणाच्या 10+2 पॅटर्नमधील 12वी उत्तीर्ण किंवा राज्य शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठाद्वारे घेतलेली समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे.

तसंच मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच महिलांनी शारीरिक पात्रताही पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, Entrance exam, NDA, जॉब