मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

UPSC क्रॅक करून तुम्हीही होऊ शकता IAS ऑफिसर; अशा पद्धतीनं आताच सुरु करा अभ्यास; वाचा टिप्स

UPSC क्रॅक करून तुम्हीही होऊ शकता IAS ऑफिसर; अशा पद्धतीनं आताच सुरु करा अभ्यास; वाचा टिप्स

अशाप्रकारे सुरु करा UPSC ची तयारी

अशाप्रकारे सुरु करा UPSC ची तयारी

तुम्हाला येत्या काही दिवसांत UPSC परीक्षेची सर्वोत्तम तयारी करायची असेल, तर या टिप्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 24 डिसेंबर: UPSC परीक्षा ही देशातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित परीक्षा (UPSC exam preparation) मानली जाते. यात तीन टप्पे आहेत – UPSC प्रिलिम्स परीक्षा, UPSC मुख्य परीक्षा 2021 आणि मुलाखत फेरी (UPSC Interview Tips). या तिन्ही टप्प्यांमध्ये चांगले गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची IAS, IPS किंवा IFS सेवेसाठी निवड केली जाते. UPSC परीक्षेच्या तयारीसाठी खास टिप्स जाणून घ्या (UPSC Exam Preparation Tips). UPSC मुख्य परीक्षा 2021 7, 8, 9, 15 आणि 16 जानेवारी 2022 रोजी (UPSC mains exam date) घेतली जाईल. नागरी सेवा परीक्षेला फार दिवस उरले नाहीत. अशा परिस्थितीत या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना त्यांची तयारी सुधारण्यासाठी कमी वेळ शिल्लक आहे. तुम्हाला येत्या काही दिवसांत UPSC परीक्षेची सर्वोत्तम तयारी करायची असेल, तर या टिप्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. NCERT पुस्तकांमधून अभ्यास करा    UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी NCERT पुस्तके (NCERT Books) मधून जाणे आवश्यक आहे. तुम्ही ज्या विषयासाठी परीक्षा देणार आहात त्याचा अभ्यासक्रम NCERT च्या पुस्तकांमधून पूर्ण करा. तसेच नोट्स एकत्र करा. Career Tips: मेडिकल क्षेत्रातील 'हे' कोर्सेस केल्यानंतर लगेच मिळू शकते नोकरी लेखन सराव आवश्यक UPSC मुख्य परीक्षा 2021 लिखित स्वरूपात घेतली जाते. म्हणूनच तुम्ही लिहिण्याचा भरपूर सराव करणे फार महत्वाचे आहे. तुम्ही जे काही वाचाल ते तुमच्याच शब्दात लिहा. जर तुमच्यासाठी ते शक्य असेल तर दररोज किमान एक तास प्रश्नांची उत्तरे लिहा. असे केल्याने पेपर लिहिण्याचा सराव चांगला होईल. मागील वर्षांचे पेपर तपासा संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षेत बसलेल्या उमेदवारांनी मागील वर्षांचे पेपर (last year Question paper UPSC) सोडवणे आवश्यक आहे. उरलेल्या काही दिवसात रोज किमान २ पेपर सोडवा. असे केल्याने यूपीएससी परीक्षेचा पॅटर्न कळेल आणि पेपर देणे सोपे होईल. रिव्हिजनवर लक्ष केंद्रित करा UPSC मुख्य परीक्षा तयारी (UPSC Exam Preparation Tips) दरम्यान पुनरावृत्ती हा एक महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही दररोज काय अभ्यास केला आहे याची उजळणी करा (UPSC mains exam 2021). उजळणी करून गोष्टी लक्षात राहतात. MPSC साठी भूगोल विषयाची तयारी कशी करावी? झोपेशी तडजोड नाही तुमचे मन ताजे ठेवण्यासाठी, झोपेशी तडजोड करू नका आणि दररोज किमान 8 तास झोप घ्या. कमी झोप घेतल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि अभ्यास करताना समस्या निर्माण होऊ शकतात.
First published:

Tags: Career opportunities, Jobs, Upsc exam

पुढील बातम्या