मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

कोरोना काळात वाढलं फ्लेबोटोमिस्टचं महत्त्व; बारावीनंतरच करू शकता यात करिअर

कोरोना काळात वाढलं फ्लेबोटोमिस्टचं महत्त्व; बारावीनंतरच करू शकता यात करिअर

करिअरच्या वेगळ्या वाटा: मेडिकल फील्डमध्ये ब्लड बँकेची (Blood Bank) भूमिका महत्वपूर्ण आहे. ब्लड बँकेत टेक्नीशियन म्हणून काम करणाऱ्या प्रोफेशनल्सला फ्लेबोटोमिस्ट (Phlebotomist) म्हटलं जातं. कुठून करायचा याचा कोर्स?

नवी दिल्ली, 25 जून: कोरोना काळात (Coronavirus Pandemic) आरोग्य व्यवस्थेचं महत्व खूप वाढलंय. देशात कोरोनाच्या दोन्ही लाटांत आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता होती. आरोग्य सेवा म्हटलं की आपल्याला फक्त डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय एवढंच माहिती असतं. मात्र, मेडिकल फील्डमध्ये पॅरा मेडिकल स्टाफ शिवाय टेक्निकल डिपार्टमेंटमध्येही लोकांची गरज असते. लॅब टेक्निशिअन, लॅब रिसर्चर आणि याशिवाय बऱ्याच पोस्ट असतात. तुम्हाला ब्लड बँक माहितीच असेल. तर मेडिकल फील्डमध्ये ब्लड बँकेची (Blood Bank) भूमिका महत्वपूर्ण आहे. ब्लड बँकेत टेक्नीशियन (Technician) म्हणून काम करणाऱ्या प्रोफेशनल्सला (Professional) फ्लेबोटोमिस्ट (Phlebotomist) म्हटलं जातं. कोरोना नंतर बरेच नवनवे आजार येत आहेत, त्यामुळे ब्लड बँकेमध्ये फ्लेबोटोमिस्टची डिमांड (Demand) वाढत आहे. चला तर जाणून घेऊया फ्लेबोटोमिस्ट म्हणून करियर (Career) करायचं असेल तर कोणत्या संधी (Opportunities) उपलब्ध आहेत ते. फ्लेबोटोमिस्टचे काम काय असते - कोणत्याही ब्लड बँकेत फ्लेबोटोमिस्टची भूमिका खूप महत्त्वाची असते. यांचं काम रुग्णांचे ब्लड सॅम्पल कलेक्ट करून त्यांचं लेबलिंग करणं असतं. याशिवाय फ्लेबोटोमिस्ट ब्लड डोनरकडून ब्लड कलेक्ट करून त्याला स्टोर करण्याचं काम करतात. Government Jobs 2021: नोकरीची सुवर्णसंधी; पाहा कसा आणि कुठे करायचा अर्ज? तसेच कलेक्ट केलेलं ब्लड कोणत्या ग्रूपचं आहे आणि ते किती सेफ आहे, यावर त्यांना लक्ष ठेवावं लागतं. या आधारेच ब्लडचं लेबलिंग केलं जातं. फ्लेबोटोमिस्टचा कोर्स कसा करणार - फ्लेबोटोमिस्ट म्हणून करियर करायचं असेल विद्यार्थांनी कोणत्याही स्ट्रीममधून 12वीं पास असणं आवश्यक आहे. यानंतर ते ब्लड बँक टेक्नोलॉजीमध्ये सर्टिफिकेट (Certificate) किंवा डिप्लोमा (Diploma) कोर्स करू शकतात. Bank Jobs after 12th: बँकिंग क्षेत्रात आहे पैसाच पैसा; जाणून घ्या करिअरच्या संधी सर्टिफिकेट कोर्स 6 महीने ते एक वर्षाचा आणि डिप्लोमा कोर्स 1 वर्ष ते 2 वर्षापर्यंतचा असतो. कोर्स करताना थेअरी पेक्षा प्रॅक्टिकल ट्रेनिंगवर (Practical Training) जास्त लक्ष देण्यात येतं. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही कोणत्याही हॉस्पिटल (Hospitals) किंवा ब्लड बँकेत 15 ते 20 हजार रुपए महिन्याची नोकरी आरामात मिळवू शकता. तुम्ही जर 12वी चं शिक्षण पूर्ण केलं असेल आणि एखादा कोर्स केल्यानंतर नोकरी मिळवण्याचं तुमचं उद्दिष्ट असेल तर तुम्ही फ्लेबोटोमिस्ट हा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स करू शकता. सध्याच्या काळात फ्लेबोटोमिस्ट पदासाठी बऱ्याच ठिकाणी जागा रिक्त असतात. त्यामुळे तुम्ही नोकरी मिळवू शकता.
First published:

Tags: Blood bank, Career, Career opportunities

पुढील बातम्या