मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Bank Jobs after 12th: बँकिंग क्षेत्रात आहे पैसाच पैसा; जाणून घ्या करिअरच्या संधींबद्दल

Bank Jobs after 12th: बँकिंग क्षेत्रात आहे पैसाच पैसा; जाणून घ्या करिअरच्या संधींबद्दल

आज आम्ही तुम्हाला बँकिंग क्षेत्रातील काही शिक्षण आणि करिअरच्या संधींबद्दल सांगणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला बँकिंग क्षेत्रातील काही शिक्षण आणि करिअरच्या संधींबद्दल सांगणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला बँकिंग क्षेत्रातील काही शिक्षण आणि करिअरच्या संधींबद्दल सांगणार आहोत.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 24 जून : बारावीनंतर (career after 12th) अनेकांना एखादा ग्रॅज्युएशन कोर्स (Graduation Courses) करून बँकेत नोकरी (Banking jobs) करण्याची इच्छा असते. मात्र यासाठी त्यांना योग्य तो मार्ग मिळत नाही. अनेक विद्यार्थी दहावीनंतर चुकीच्या स्ट्रीममध्ये बारावी करतात त्यामुळे त्यांना बँकेत जॉब (Latest Banking Jobs) करता येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बँकिंग क्षेत्रातील (Banking Field jobs)काही शिक्षण आणि करिअरच्या (Education and Career) संधींबद्दल सांगणार आहोत.

बँकमध्ये जॉब करण्यासाठी किमान ग्रॅज्युएशन पूर्ण असणं आवश्यक आहे. बँकमध्ये क्लर्क (Bank Clerk jobs) म्हणून जॉबच्या संधी असतात. याव्यतिरिक्त शिपाई (peon jobs) आणि बँक मॅनेजर (Bank Manager jobs) याही पोस्ट असतात. या सर्व पोस्टसाठी कम्प्युटरबाबत ज्ञान असणं आवश्यक आहे.

हे वाचा - IMP: शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करताय? आधी 'या' परीक्षा नक्की द्या

बारावीनंतर बीए (BA) किंवा बीकॉम (Bcom) बँकिंग किंवा फायनान्स (Finance sector jobs) या क्षेत्रात करू शकता. यामुळे तुम्हाला बँकेच्या कामांबद्दल आधीपासूनच ज्ञान मिळेल. मात्र तुमच्याकडे ही पदवी नसेल तर चिंता करू नका कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशन करून तुम्ही बँकिंगकडे वळू शकता.

नोकरीच्या संधी

पदवीनंतर सरकारी बँकांमध्ये (Government bank jobs) नोकरी मिळविण्यासाठी तुम्हाला आयबीपीएस परीक्षा (IBPS exam) द्यावी लागेल. आयबीपीएस विविध बँकांमध्ये भरतीसाठी पीओ (PO), एसओ (SO) इत्यादी पदांसाठी परीक्षा घेतो. याशिवाय एसबीआय (SBI jobs) आणि आरआरबी (RBI jobs) विविध पदांसाठी परीक्षा घेतात. या परीक्षा पास करून तुम्ही बँकेत अधिकारी किंवा क्लर्क म्हणून नोकरी करू शकता.

First published:

Tags: Bank exam, Career opportunities, Sbi bank job