Government Jobs 2021: नोकरीची सुवर्णसंधी; पाहा कसा आणि कुठे करायचा अर्ज?

Government Jobs 2021: नोकरीची सुवर्णसंधी; पाहा कसा आणि कुठे करायचा अर्ज?

सर्व इच्छुक उमेदवारांना असं आवाहन केलं जात आहे, की अधिकृत वेबसाइटवरचं भरतीविषयक निवेदन वाचूनच संबंधितांना अर्ज करावा.

  • Share this:

मुंबई 25 जून: पोलिस, बँका, विद्यापीठं, शाळा अशा अनेक प्रकारच्या सरकारी संस्थांमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या नोकरीकरिता इच्छुक उमेदवार संबंधित विभागांच्या/संस्थांच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अंतिम मुदतीपर्यंत अर्ज करू शकतात. सर्व इच्छुक उमेदवारांना असं आवाहन केलं जात आहे, की अधिकृत वेबसाइटवरचं भरतीविषयक निवेदन वाचूनच संबंधितांना अर्ज करावा. कारण नियमानुसार केलेला अर्जच वैध ठरणार आहे.

GETCO Recruitment 2021 :

गुजरात एनर्जी ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (Gujarat Energy Transmission Corporation Limited) ज्युनिअर इंजिनीअर (JE) या पदासाठी अर्ज मागवले आहेत. या पदाकरिता इच्छुक उमेदवार getcogujarat.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. प्रसिद्ध झालेल्या निवेदनानुसार एकूण 352 रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत 8 जुलै 2021 ही आहे.

Interview देताना 'या' महत्त्वाच्या गोष्टी करायला विसरू नका; अन्यथा हातची नोकरी जाणार

Army Public School Recruitment 2021 :

जयपूरच्या आर्मी पब्लिक स्कूलमध्ये टीजीटी आणि पीजीटी शिक्षक यांसह अनेक पदांवर भरती होणार आहे. या पदांकरिता इच्छुक असलेले उमेदवार apsjaipur.edu.in या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. 58 रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले असून, 28 जून 2021 ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.

Cooperative Bank Recruitment 2021 :

हिमाचल प्रदेश स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेला अनेक पदांवर भरती करायची आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवार hpscb.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 149 रिक्त पदांवर भरती केली जाणार असून, 2 जुलै 2021पर्यंत अर्ज करता येणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे.

इंग्रजी बोलायला घाबरणारे अभिषेक शर्मा बनले IAS ऑफिसर; कठोर मेहनतीने गाठलं ध्येय

Police SI Recruitment 2021 :

हरियाणा राज्यात पोलिस विभागात उपनिरीक्षक पदावर भरती होणार आहे. यासाठी पुरुषांसोबत महिलाही अर्ज करू शकणार आहेत. हरियाणा कर्मचारी निवड आयोगाने यासाठी अधिसूचना जारी केली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 19 जून 2021पासून सुरू झाली असून, अंतिम मुदत 2 जुलै 2021 ही आहे. hssc.gov.in या वेबसाइटवरून अर्ज करायचा आहे. 465 रिक्त पदांवर ही भरती होणार आहे.

University Recruitment 2021 :

आसाममधल्या तेजपूर विद्यापीठाने लोअर डिव्हिजन क्लार्कसहित अनेक पदांवर भरती करणार असल्याचं जाहीर केलं आहे. इच्छुक उमेदवार www.tezu.ernet.in या वेबसाइटवर जाऊन 23 जुलै 2021पर्यंत अर्ज करू शकतात. 16 पदांवर भरती होणार आहे.

First published: June 25, 2021, 7:35 PM IST

ताज्या बातम्या