• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Oracle & Cyient 'या' टॉप IT कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर पदांसाठी नोकरीची संधी; बघा सविस्तर माहिती

Oracle & Cyient 'या' टॉप IT कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर पदांसाठी नोकरीची संधी; बघा सविस्तर माहिती

या दोन IT कंपन्या भारतातील काही शहरांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी (IT companies jobs for Software Engineers) पदभरती करणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 20 सप्टेंबर: गेल्या दीड वर्षांमध्ये कोरोनामुळे जगभरात अनेकांचे जॉब गेले आहेत. अनेकांना आपल्या व्यवसायात नुकसान सहन करावं लागलं आहे. मात्र IT कंपन्या (IT sector Jobs) मात्र जोमात आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात काही टॉप IT कंपन्या भारतातील उमेदवारांसाठी बंपर जॉब (IT companies Jobs) ऑफर्स घेऊन आल्या आहेत. यामधीलच काही कंपन्या म्हणजे Oracle (Oracle India Software Engineer Jobs) आणि Cyient (Cyient TSP DevSecOps CoE- Architect jobs)  या दोन IT कंपन्या भारतातील काही शहरांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी (IT companies jobs for Software Engineers) पदभरती करणार आहे. यासंबंधीचं वृत्त TECHGIG नं प्रकाशित केलं आहे. चला तर मग जाणून घेऊया यासंबंधीच्या डिटेल्स. Oracle India Pvt Ltd Recruitment या पदासाठी भरती सॉफ्टवेअर डेव्हलपर (Software Developer) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 0 - 2 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. जॉब्सचं ठिकाण Oracle India या कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर पदासाठी Hyderabad, Bengaluru आणि Gurugram इथे भरती होणार आहे. उमेदवारांसाठी Job संबंधी माहिती ऑटोमेशन संबंधी काही suits वर काम करण्याची क्षमता असणं आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार टेस्ट कोड किंवा फ्रेमवर्क ऑप्टिमाइझ करणं आवश्यक आहे. कमी गायडन्स मध्ये जास्तीत जास्त काम करण्याचीक्षमता असणं आवश्यक आहे. हे वाचा - TCS Recruitment: TCS कंपनीत Python डेव्हलपर्स पदासाठी होणार मोठी पदभरती Cyient Limited Recruitment या पदासाठी भरती TSP DevSecOps CoE- Architect शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार शिक्षण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित फिल्डमध्ये 9 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणं आवश्यक आहे. जॉब्सचं ठिकाण या कंपनीत संबंधित पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचं जॉब्सचं ठिकाण हैदराबाद असणार आहे. Job संबंधी माहिती जेनकिन्स आणि क्लाउड (AWS किंवा Azure) सह CI पाइपलाइन सेट करणे. पाइपलाइन आणि मॉनिटरिंगचे HA कॉन्फिगर करणे. कंपनीच्या वातावरणात जलद गतीनं काम करणारे उमेदवार असणं आवश्यक. या दोनही कंपन्यांमध्ये वरील जागांसाठी अप्लाय करण्यासाठी कंपन्यांची ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन उमेदवार अप्लाय करू शकतात. हे वाचा - Infosys Recruitment: देशातील दिग्गज कंपनीत IT प्रोफेशनल्सना नोकरीची मोठी संधी TCS मध्येही नोकरीची संधी TCS कंपनी सध्या पायथन कौशल्यातील 2-5 वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना नोकरी देणार आहे. या उमेदवारांनी या आधी मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम केलं असणं आवश्यक आहे. जेणेकरून TCS च्या सध्याच्या काही प्रोजेक्ट्समध्ये हे कर्मचारी हातभार लावू शकतील. Developer किंवा Tester किंवा Administrator या पदांसाठी ही भरती असणार आहे. यातही उमेदवारांचं Python चं शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 2-5 वर्षांचा अनुभव असणंही आवश्यक आहे. यासाठी TCS संपूर्ण देशात उमेदवारांना पोस्टिंग देणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑक्टॉबर 2021 असणार आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published: