जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Infosys Recruitment: देशातील दिग्गज कंपनीत IT प्रोफेशनल्सना नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Infosys Recruitment: देशातील दिग्गज कंपनीत IT प्रोफेशनल्सना नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Infosys Recruitment: देशातील दिग्गज कंपनीत IT प्रोफेशनल्सना नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

आता इन्फोसिस (Infosys current jobs) नं पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 सप्टेंबर: देशातील दिग्गज IT कंपनी Infosys मध्ये येत्या काही काळात मोठी पदभरती (Infosys Recruitment 2021)  होणार आहे. IT प्रोफेशनल्सना (Infosys Recruitment for IT Professionals) या कंपनीत काम करण्याची मोठी संधी मिळणार आहे. देशात कोरोनामुळे इतर कंपन्या जरी नुकसान सहन करत असतील तरी IT क्षेत्राला (IT sector jobs) मात्र उधाण आलं आहे.  देशातील अनेक IT कंपन्यांना (Latest jobs in IT) या काळात बराच फायदा झाला आहे. त्यामुळे या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचनुसार आता इन्फोसिस (Infosys current jobs) नं पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या, इन्फोसिस RPA डेव्हलपर/कन्सल्टंटसह अनेक जॉब प्रोफाइलसाठी उमेदवार नियुक्त करत आहे. इन्फोसिस ज्या इतर रिक्त पदांसाठी भरती करत आहे त्यामध्ये प्रिन्सिपल आर्किटेक्ट, स्पेशॅलिस्ट प्रोग्रामर -जावा मायक्रो सर्व्हिसेस, टेक्नॉलॉजी अॅनालिस्ट - मर्न स्टॅक, टेक्नॉलॉजी लीड - रिएक्ट जेएस, कन्सल्टंट स्पेशालिस्ट प्रोग्रामर -बिगडेटा आणि अझूर डेव्हलपर्स यांचा समावेश आहे. प्रत्येक कारकीर्द हा एक प्रवास आहे आणि म्हणूनच इन्फोसिसमध्ये  उमेदवारांना त्यांच्या कारकीर्दीत पुढे जाण्यासाठी योग्य संधी आणि पाठिंबा मिळतो तसंच पुढील यशासाठी संधी मिळते असं Infosys नं आपल्या अधिकृत वेबसाईटवर म्हंटलं आहे. हे वाचा - IT क्षेत्रात नोकऱ्याच नोकऱ्या; मोठं पॅकेज, बोनस आणि 120 टक्के पगारवाढ! कंपनीने अलीकडेच भारतातील 19,230 पदवीधर आणि देशाबाहेर 1,941 पदवीधरांची नियुक्ती करून आपली प्रतिभा दाखवून दिली आहे असं Infosys चे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी असं जूनमध्ये सांगितलं होतं. या लोकेशन्ससाठी असणार भरती इन्फोसिस सध्या भारतभरातील अनेक भरती करत आहे. बेंगळुरू, कोईमतूर, चेन्नई, हैदराबाद, भुवनेश्वर आणि मुंबई या काही महत्त्वाच्या ठिकाणी सध्या Infosys ची भरती सुरु आहे. इतरही काही लोकेशन्सवर इन्फोसिस येणाऱ्या काही काळामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देणार आहे. हे वाचा - PMC Recruitment: पुणे महानगरपालिकेत तब्बल 203 जागांसाठी बंपर भरती; लगेच करा अर्ज IT सेक्टरमध्ये वाढले जॉब्स दीड वर्षांपूर्वी कोरोना महामारीच्या एकदम सुरूवातीला, कित्येक कंपन्या या परिस्थितीचा आढावा घेत होत्या. त्यामुळे कित्येकांनी भरती थांबवली होती, तर अनेकांनी आहे त्या कामगारांमध्ये कपात सुरू केली होती. मात्र आता, मोठ्या प्रमाणात भरती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात प्रावीण्य असलेल्यांची मागणी सध्या वाढली आहे. आयटी क्षेत्रामध्ये (IT sector vacancies) ॲप डेव्हलपर, लीड कन्सल्टंट, सेलफोर्स डेव्हलपर आणि साईट रिलायबिलिटी इंजिनियर या पदांसाठी 150 ते 300 टक्के मागणी वाढली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात