मुंबई, 19 सप्टेंबर: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या देशातील मोठ्या IT कंपनीमध्ये Python डेव्हलपर्ससाठी (TCS Recruitment for Python Developers) मोठी पदभरती होणार आहे. यासाठी सूचना जारी करण्यात आली आहे. अनुभवी IT प्रोफेशनल्स (IT Professional Jobs) आणि पायथॉन डेव्हलपर्ससाठी ही भरती असणार आहे. TCS ला (TCS Latest recruitment) कोरोनाच्या काळात प्रचंड नफा मिळालं आहे. त्यामुळे आता अनेक नवीन कर्मचाऱ्यांची भरती कंपनी यशाचं शिखर गाठू इच्छित आहे. ही भरतीची बातमी TechGig नं प्रकाशित केली आहे.
TCS कंपनी सध्या पायथन कौशल्यातील 2-5 वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना नोकरी देणार आहे. या उमेदवारांनी या आधी मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम केलं असणं आवश्यक आहे. जेणेकरून TCS च्या सध्याच्या काही प्रोजेक्ट्समध्ये हे कर्मचारी हातभार लावू शकतील.
Developer किंवा Tester किंवा Administrator या पदांसाठी ही भरती असणार आहे. यातही उमेदवारांचं Python चं शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 2-5 वर्षांचा अनुभव असणंही आवश्यक आहे. यासाठी TCS संपूर्ण देशात उमेदवारांना पोस्टिंग देणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑक्टॉबर 2021 असणार आहे.
हे वाचा - PMC Recruitment: पुणे महानगरपालिकेत तब्बल 203 जागांसाठी बंपर भरती; लगेच करा अर्ज
भरतीसाठी काही नियम
या भरतीसाठी 45 मिनिटांची MCQ फेरी आणि 60 मिनिटांची कोडिंग फेरी समाविष्ट आहे.
उमेदवार Pypy आणि Python भाषेत कोड सबमिट करू शकतात.
हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी डेव्हलपर्सना दोन चान्सेस दिले जाणार आहेत.
डेव्हलपर्स कोडवर काम करताना त्यांना ऑनलाइन वेबकॅम प्रोक्टोरिंग अनिवार्य आहे.
डेस्कटॉप ब्राउझरचं Google Chrome 53+, Internet Explorer 10+, Mozilla Firefox 60+ हे व्हर्जन असणं आवश्यक आहे.
TCS चं WFH होणार बंद
भारतातील सॉफ्टवेअर जायंट 80 टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयातून काम सुरू करण्यासाठी परत बोलावण्याची योजना आखत आहे. कंपनीने म्हटले आहे की त्याच्या जवळजवळ 90 टक्के कर्मचारी लसीकरण करत आहेत. अगदी TCS, TCS चे मुख्य कार्यकारी अधिकारी कंपनीच्या जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत आणण्याच्या योजनेबद्दल प्लॅन करत आहेत.
हे वाचा - Infosys Recruitment: देशातील दिग्गज कंपनीत IT प्रोफेशनल्सना नोकरीची मोठी संधी
TCS Rebegin महिलांना मिळणार नोकरी
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (TCS) नोकरी शिधणाऱ्या महिलांसाठी लवकरच मोठी पदभरती (TCS jobs for women) होणार आहे. TCS च्या Rebegin या उपक्रमाच्या (TCS Rebegin) माध्यमातून ही भरती केली जाणार आहे. Rebegin हा TCSचा एक उपक्रम आहे जो प्रतिभावान महिला प्रोफेशनलना त्यांच्या कारकीर्दीला योग्य पात्रता देण्याची संधी प्रदान करतो. त्यामुळे महिलांना आता IT क्षेत्रात (IT sector jobs) स्वतःची ओळख निर्माण करण्याची तसंच नोकरी करण्याची मोठी संधी प्राप्त होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, TCS chairman, जॉब