जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / तरुणांनो तयार राहा! देशात 'या' सेक्टरमध्ये उपलब्ध होणार तब्बल 10 लाख नोकऱ्या; राज्यातही पडणार जॉब्सचा पाऊस

तरुणांनो तयार राहा! देशात 'या' सेक्टरमध्ये उपलब्ध होणार तब्बल 10 लाख नोकऱ्या; राज्यातही पडणार जॉब्सचा पाऊस

 'या' सेक्टरमध्ये उपलब्ध होणार तब्बल 10 लाख नोकऱ्या

'या' सेक्टरमध्ये उपलब्ध होणार तब्बल 10 लाख नोकऱ्या

देशातील वायू प्रदूषणाची स्थिती लक्षात घेता येत्या काही वर्ष मध्ये एअर क्वालिटी कंट्रोल या विषयाला अधिक महत्त्वं प्राप्त होणार आहे. तसंच या क्षेत्रांमध्ये येत्या काही वर्षांमध्ये तब्बल दहा लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 ऑगस्ट: संपूर्ण जगात सध्या ग्लोबल वॉर्मिंग आणि झाडांची संख्या कमी होत चालल्यामुळे हवेच्या प्रदूषणात प्रचंड वाढ होत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सध्या इंडिया क्लिन एअर समिट 2022 (ICAS Summit 2022) ही कॉन्फरन्स सुरु आहे. ही चार दिवसीय कॉन्फरन्स बंगळुरू इथे सुरु आहे. या कॉन्फरन्समध्ये देशातील काही एक्सपर्ट सामील झाले आहेत. देशातील वायू प्रदूषणाची स्थिती लक्षात घेता येत्या काही वर्ष मध्ये एअर क्वालिटी कंट्रोल या विषयाला अधिक महत्त्वं प्राप्त होणार आहे. तसंच या क्षेत्रांमध्ये येत्या काही वर्षांमध्ये तब्बल दहा लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत असं मत काही एक्सपर्ट्सनी व्यक्त केलं आहे. विशेषतः महाराष्ट्र सारख्या राज्यात तर अधिक नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात असंही मत व्यक्त करण्यात आलं आहे. देशातील दहा लाख नोकऱ्यांपैकी महाराष्ट्रात 20 ते 40 हजार नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. “भारतात हवा गुणवत्ता व्यवस्थापन क्षेत्रात सुमारे दहा लाख रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. या संदर्भातील प्रशिक्षण आयआयटीमध्ये सुरु केलं जाऊ शकतं. महाराष्ट्रात आयआयटी मुंबईने यासाठी पुढाकार घेतला तर देशभरातील इतर शैक्षणिक संस्थांमध्येदेखील त्याची सुरुवात होऊ शकते,” असं आयआयटी कानपूरच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील वरिष्ठ प्रो. एस एन त्रिपाठी म्हणाले आहेत. फ्रेशर्ससाठी IMP बातमी! मनात येईल तेव्हा Resume सेंड करू नका; ‘ही’ असते कंपनीला CV पाठवण्याची योग्य वेळ मोठे औद्योगिक क्षेत्र असलेल्या महाराष्ट्रात देशभरातील सर्वाधिक म्हणजेच 19 नॉन अटेनमेंन्ट शहरे (हवा प्रदूषण विहित पातळीपेक्षा अधिक असलेली शहरं) आहेत. हवा गुणवत्ता व्यवस्थापनाच्या क्षेत्रात कृतीशील पावले उचलून महाराष्ट्र इतर राज्यांसाठी उदाहरण निर्माण करु शकतं असा विश्वास या कॉन्फरंसमध्ये सामील झालेल्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रानं हवा प्रदूषणाचा लढा हा केवळ अल्पकालिन उपाययोजनांपुरताच मर्यादीत ठेऊ नये याकडे लक्ष द्यावं लागेल असंही तज्ज्ञ म्हणाले. सध्या भारताकडे सर्वसमावेशक असा हवा गुणवत्ता कार्यक्रम नाही. इतकेच नाही तर हवा गुणवत्ता क्षेत्रासाठी आपल्याकडे शैक्षणिक क्षेत्रदेखील पूर्णपणे प्रशिक्षित नाही. त्यामुळे “शैक्षणिक, तंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्रात या नोकऱ्या विकसित करणे राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाला दुसऱ्या टप्प्यात पुढे जाण्यासाठी लक्षणीय मदत करणारे ठरेल,” असं प्रो. त्रिपाठी यांनी नमूद केलं. तब्बल 1,40,000 रुपये पगारासह फूड कॉर्पोरेशन इंडियामध्ये मिळेल नोकरी; पण तुम्ही आहात का पात्र? बघा डिटेल्स तसंच “महाराष्ट्र हे देशाचं आर्थिक केंद्र आहे. उपाययोजनांची अंमलबजावणी, सामाजिक आर्थिक आव्हानांची हाताळणी, प्रशासकीय रचना अशा अनेक बाबतीत महाराष्ट्र नेतृत्वाची भूमिका बजावू शकतो यात काहीच शंका नाही,” असं सेंटर फॉर एअर पोल्यूशन स्टडीजच्या (सीएपीएस) प्रमुख, डॉ. प्रतिमा सिंग म्हणाल्या आहेत. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्याही उपलब्ध होऊ शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात