मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

फ्रेशर्ससाठी IMP बातमी! मनात येईल तेव्हा Resume सेंड करू नका; 'ही' असते कंपनीला CV पाठवण्याची योग्य वेळ

फ्रेशर्ससाठी IMP बातमी! मनात येईल तेव्हा Resume सेंड करू नका; 'ही' असते कंपनीला CV पाठवण्याची योग्य वेळ

कंपनीला CV पाठवण्याची योग्य वेळ

कंपनीला CV पाठवण्याची योग्य वेळ

आज आम्ही तुम्हाला जॉबसाठी कंपनीला Resume पाठवण्याची योग्य वेळ कोणती आणि आठवड्याच्या कोणत्या दिवशी (Perfect Time & Day to send Resume) Resume पाठवणं उत्तम हे सांगणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 25 ऑगस्ट: कोणताही जॉब मिळवण्यासाठी सुरुवातीला त्या कंपनी तुम्हाला Resume देणं आवश्यक असतं. जर त्या कंपनीतील वरिष्ठांना तुमचा Resume आवडला (Resume Tips) तरच तुम्हाला पुढील प्रोसेससाठी संधी दिली जाते. पण जर तुमच्या Resume मध्ये चुका असतील तर तुम्हाला कधीच बोलावण्यात येणार नाही. एका सामान्य कागदासारखी त्या Resume ची किंमत होईल. म्हणूनच Resume पाठवणं महत्त्वाचं असतं. पण जसा Resume पाठवणं महत्त्वाचं आहे, तसंच तो Resume योग्यवेळी पाठवणं महत्त्वाचं आहे. जर संबंधित कंपनीला तुम्ही योग्यवेळी योग्य दिवशी Resume पाठवला नाहीत तर तुमचा इम्प्रेशन खराब होऊ शकतं. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जॉबसाठी कंपनीला Resume पाठवण्याची योग्य वेळ कोणती आणि आठवड्याच्या कोणत्या दिवशी (Perfect Time & Day to send Resume) Resume पाठवणं उत्तम हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

सामान्यतः, Resume पाठवण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी 9 वाजण्यापूर्वी किंवा रात्री 9 नंतर. आता तुम्ही म्हणाल असं का? तर यामागे कारण आहे. बऱ्याच कंपनीचे अधिकारी सकाळी नऊ वाजताच्या आधी किंवा रात्री नऊ नंतर आपले इमेल्स चेक करतात. त्यामुळे जर या वेळेत तुम्ही आमसुलं Resume त्यांना पाठवला तर तुम्ही त्यांच्या लक्षात येऊ शकता.

नक्की कोण असतात जिल्हाधिकारी? काय असतात त्यांची कर्तव्य? सुविधांपासून पगारापर्यंत इथे माहिती मिळेल माहिती

तसंच सकाळी 9 च्या आधी पाठवणं अधिक फायदेशीर ठरू शकतं कारण हे सूचित करू शकतं की तुम्ही गंभीर आहात आणि नोकरी मिळवण्यासाठी दृढ आहात. नोकरी शोधण्यासाठी तुम्ही सकाळी लवकर उठण्यास तयार आहात हे त्या कंपनीतील अधिकाऱ्यांना समजू शकेल. तुमचा बायोडाटा पाठवण्यापूर्वी कॅलेंडर तपासा जेणेकरून तुम्ही तो सुट्टीच्या किंवा वीकेंडमध्ये सबमिट करत नाही ना याची खात्री करा.

आठवड्यातील कोणता दिवस Resume सेंड करण्यासाठी उत्तम?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तुमचा Resume पाठवण्याचा सर्वोत्तम दिवस मंगळवार आणि गुरुवार दरम्यान आहे. असं केल्यामुळे हायरिंग मॅनेजर तुमचा रेझ्युमे पाहण्याची शक्यता वाढू शकते. याच्यामागेही कारण आहे. विकेंड येण्यापूर्वी जर तुमचा Resume कंपनीपर्यंत पोहचला तर तो बघितला जाण्याची शक्यता अधिक असते.

12वी नंतर थेट IIT मध्ये प्रवेश हवाय ना? मग अशी करा JEE Advanced ची तयारी

बरेचदा हायरिंग मॅनेजर्स विकेंडला आलेले मेल्स बघत नाहीत. त्यामुळे जर तुमचा Resume विकेंड च्या आधीच त्यांच्याकडे पोहोचला तर तो कचऱ्यात जाणार नाही आणि तुम्हाला जॉब मिळण्याचे चान्सेस वाढतील.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert