• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • ECHS Mumbai Recruitment: आठवी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; तब्बल 16,800 रुपये पगार

ECHS Mumbai Recruitment: आठवी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; तब्बल 16,800 रुपये पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 23 सप्टेंबर: ECHS पॉलीक्लिनिक मुंबई (ECHS Polyclinic Mumbai recruitment 2021) मध्ये 8वी पास असलेल्यांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ECHS Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. शिपाई या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती शिपाई (Peon) ECHS Mumbai Recruitment 2021
  ECHS Mumbai Recruitment 2021
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शिपाई (Peon) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवी पास असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार शिपाई (Peon) - 16,800 रुपये प्रतिमहिना हे वाचा - फेस्टिव्ह सीजनआधी Flipkart मध्ये नोकरीची संधी, 4000 लोकांना मिळेल जॉब अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी आणि पत्ता स्टेशन हेडक्वार्टर, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन्स ट्रॉम्बे रोड, मानखुर्द मुंबई- 400088./ chssupnagar@gmail.com निवड प्रक्रिया या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. त्यासाठी दिलेल्या पत्त्यावर वेळेत उपस्थित राहणं आवश्यक आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 05 ऑक्टोबर 2021
  JOB TITLE  ECHS Mumbai Recruitment 2021
  या पदांसाठी भरती  शिपाई (Peon)
  शैक्षणिक पात्रता  उमेदवारांनी आठवी पास असणं आवश्यक आहे
  इतका मिळणार पगार   16,800 रुपये प्रतिमहिना
  निवड प्रक्रिया  उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत (Kalyan Dombivli Municipal Corporation) विविध पदांच्या तब्बल 26 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.  सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, केंद्र प्रमुख कम गुणवत्ता व्यवस्थापक, वरिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ तंत्रज्ञ या पदांसाठी ही भरती (KDMC Recruitment 2021) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत आणि थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 असणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा. पुणे मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये भरती नवीनतम पुणे मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये (Maharashtra Metro Rail Corporation Pune)  विविध पदांच्या तब्बल 96 जागांसाठी मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune Metro Rail Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य प्रकल्प, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ स्थानक नियंत्रक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ तंत्रज्ञ, खाते सहाय्यक या पदांसाठी ही भरती (pune metro recruitment 2021 apply online) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे. पुणे मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमधील पदभरतीसाठी अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा
  Published by:Atharva Mahankal
  First published: