मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

क्या बात है! ऑफिस, घर किंवा कुठूनही करू शकता काम; 'या' कंपनीनं कर्मचाऱ्यांना दिली जबरदस्त ऑफर

क्या बात है! ऑफिस, घर किंवा कुठूनही करू शकता काम; 'या' कंपनीनं कर्मचाऱ्यांना दिली जबरदस्त ऑफर

Meesho ने  बाउंड्रीलेस ऑफिस मॉडेल  जाहीर केलं

Meesho ने बाउंड्रीलेस ऑफिस मॉडेल जाहीर केलं

काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जबरदस्त ऑफर्स (Offers by companies to employees) देण्यास सुरुवात केली आहे. अशाच एका ईकॉमर्स कंपनीनं कर्मचाऱ्यांना एक भन्नाट ऑफर दिली आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 09 फेब्रुवारी: गेल्या दीड ते दोन वर्षांपासून जगभरात कोरोनानं (Corona) थैमान घातलं आहे. यामुळे अनेकांचा जीव गेला आहे तर अनेकांच्या जीवनावर आणि राहणीमानावर परिणाम झाला आहे. अनेकांची नोकरीही गेली आहे. कोरोनाच्या या परिस्थितीमुळे अनेक कंपन्या वर्क फ्रॉम होम (Work from home) करत आहेत. अनेक कंपन्यांचे कर्मचारी घरूनच काम करत आहेत. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागल्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमध्ये (Work from Office) बोलावण्यास सुरुवात केली आहे. कर्मचाऱ्यांचा कौल मात्र वर्क फ्रॉम होमकडे (will work from continue) आहे. म्हणूनच काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जबरदस्त ऑफर्स (Offers by companies to employees) देण्यास सुरुवात केली आहे. अशाच एका ईकॉमर्स कंपनीनं कर्मचाऱ्यांना एक भन्नाट ऑफर दिली आहे.

इंटरनेट कॉमर्स कंपनी Meesho ने (Meesho online shopping) बाउंड्रीलेस ऑफिस मॉडेल (Boundary less workplace model) जाहीर केलं आहे, या मॉडेलनुसार फर्म (Meesho work from home model) आपल्या कर्मचार्‍यांना घर, कार्यालय किंवा त्यांच्या आवडीच्या कोणत्याही ठिकाणी काम करण्याचा अधिकार देत आहे. कर्मचार्‍यांच्या मागणीच्या आधारावर, कंपनी उच्च प्रतिभा घनता असलेल्या ठिकाणी सॅटेलाईट ऑफिसेस देखील स्थापन करणार आहे. इतकंच नाही तर कर्मचार्‍यांच्या अनुभवावर लक्ष केंद्रित करून, कंपनी रिअल-टाइम आणि व्हर्च्युअल सहयोग (Virtual support) साधनांसह कर्मचाऱ्यांना सक्षम करणार आहे.

UPSC मुलाखतीत विचारले जातात कल्पनेपलीकडील प्रश्न; उत्तरं वाचून जाल चक्रावून

कर्मचाऱ्यांना मिळणार सहलीची संधी

टीम्सना वैयक्तिकरित्या भेटण्यासाठी आणि सहयोग करण्यासाठी पुरेशा संधी उपलब्ध करून देत, कंपनी त्रैमासिक काउन्सिलमध्ये सहभागी होण्यासाठी सहली आणि गोव्यासारख्या ठिकाणी Annual वर्क सारखे उपक्रम सुरू करत आहे. काम करणाऱ्या पालकांना पाठिंबा देण्यासाठी, ते सहा वर्षांखालील मुलांसह कर्मचाऱ्यांसाठी डे-केअर सुविधा प्रायोजित करणार आहे. बंगळुरूमधील मीशोच्या मुख्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

या नोकरदारांचे Work From Home चे दिवस संपले; आता TCS, Infosys, Wipro, HCL कर्मचाऱ्यांनाही ऑफिसमध्ये जावं लागणार?

मिळतील हे लाभ

कर्मचाऱ्यांना त्यांच्या काम करण्याच्या शहरात काही लोकल स्पोर्ट्स किंवा समजून ग्रुप्समा जॉईन करता येणार आहे. यासाठी त्यांना ऑफिसकडून प्रोत्साहित केलं जाणार आहे. तसंच उमेदवारांना 30-week gender-neutral parental leave policy लागू होणार आहे. या आणि इतर अनेक सुविधा कंपनीकडून कर्मचाऱ्यांना दिल्या जाणार आहेत. कोरोननंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती चांगली राहावी आणि कंपनीला याचा फायदा व्हावा यासाठी कर्मचाऱ्यांना या हन्नात सुविधा कंपनी देत आहे.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Sale offers, Work from home, Worker, जॉब