• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • राज्यातील बारावी उत्तीर्ण शेकडो विद्यार्थ्यांचं पुढील शिक्षण धोक्यात; अजूनही श्रेणी सुधार परीक्षा नाही

राज्यातील बारावी उत्तीर्ण शेकडो विद्यार्थ्यांचं पुढील शिक्षण धोक्यात; अजूनही श्रेणी सुधार परीक्षा नाही

सर्वसामान्य विद्यार्थी कसे पास होणार हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

  • Share this:
मुंबई, 18 ऑगस्ट:  बारावी उत्तीर्ण (12th Passed Students) झालेल्या मात्र अपेक्षेनुसार गुण न मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शिक्षण मंडळानं बारावी श्रेणी सुधार योजनेच्या (Grade Improvement Exam) विद्यार्थ्यांना यंदा मूल्यांकन पद्धतीतून वगळलं आहे. यामुळे तब्बल 2500 हुन अधिक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आलं आहे. एकीकडे कोरोना काळात (Corona) शिक्षणाचं नुकसान झाले आहे त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी कसे पास होणार हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. प्रणाली कासुर्डे ही २०२० मध्ये बारावी उत्तीर्ण झाली. मात्र तिला PCB (Physics, Chemistry, Biology) विषयांच्या समूहात ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण होते. त्यामुळे तिनं शिक्षण मंडळाच्या 'श्रेणी सुधार योजनेंतर्गत' पुन्हा परीक्षा देण्यासाठी प्रवेश अर्ज भरला कोरोनामुळे पुरवणी परीक्षा रद्द झाली. त्यामुळे तिनं फेबुवारी महिन्यात होणाऱ्या नियमित परीक्षेसाठी अर्ज केला. त्यानुसार परीक्षेचं वेळापत्रकही जाहीर झालं. मात्र पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे राज्य सरकारनं 2 जुलै 2021 ला बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. हे वाचा - BARC Mumbai Recruitment: भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई इथे भरती; 86 हजार पगार परीक्षेला प्रविष्ठ नियमित आणि बाह्य विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकनाची (Assessment) एक पद्धत ठरवली. मात्र, या मूल्यांकन पद्धतीतून 'श्रेणी सुधार योजनेंतर्गत' अर्ज करणाऱ्यांना वगळण्यात आलं. त्यामुळे आता अशा अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आलं आहे. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे आमचंही मूल्यांकन करून गुण देण्यात यावेत किंवा आमची परीक्षाघेण्यात यावी अशी विनंती विद्यार्थी करत आहेत. CBSE घेणार परीक्षा एकीकडे राज्यसरकार पत्रव्यवहार करूनही उत्तर देत नाही तर दुसरीकडे CBSE बोर्डाच्या 12वी साठी 16 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2021 पर्यंत श्रेणी सुधारणा आणि कंपार्टमेंट परीक्षा (CBSE Compartment Exam) घेण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. कंपार्टमेंट आणि श्रेणी सुधारणा परीक्षा देश आणि परदेशातील नियुक्त केंद्रांवर घेतली जाणार आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. मग राज्यातील शिक्षण विभागानं या प्रकरणी ठोस निर्णय घेतला पाहिजे .अन्यथा शेकडो मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी संधीच मिळाणार नाही असं काही विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं म्हणणं आहे.
Published by:Atharva Mahankal
First published: