मुंबई, 16 डिसेंबर: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET 2023) साठी परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. NEET 2023 ची परीक्षा 7 मे रोजी होणार आहे. या परीक्षेची अर्ज प्रक्रिया जानेवारी महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, उमेदवार NEET च्या अधिकृत वेबसाइट, neet.nta.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. JEE Mains 2023: परीक्षेसाठी तयार राहा! रजिस्ट्रेशन प्रोसेस झाली सुरु; या लिंकवरून लगेच करा नोंदणी NEET 2023 ची परीक्षा आता फक्त एकदाच घेतली जाईल आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत ही तारीख दोन महिन्यांनी वाढली आहे. सन 2022 मध्ये NEET परीक्षा 17 जुलै रोजी घेण्यात आली होती. NEET 2023 तारखेची लवकर घोषणा झाल्यामुळे, उमेदवारांना आता त्यांच्या तयारीची योजना करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. NEET व्यतिरिक्त, NTA ने अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा JEE Main आणि CUET 2023 चे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. जेईईचे मुख्य सत्र जानेवारीमध्ये आणि सत्र 2 एप्रिलमध्ये तर CUET मे-जूनमध्ये होणार आहे. याशिवाय, ICAR AIEEA परीक्षा JEE Mains च्या दुसऱ्या सत्रानंतर काही दिवसांनी एप्रिलमध्ये होणार आहे. क्या बात है! फ्रेशर्ससाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी; ‘या’ मल्टिनॅशनल कंपनीत बंपर भरती परीक्षा किती भाषांमध्ये होणार? NEET UG परीक्षा 2023 ही पेन आणि पेपर आधारित चाचणी असणार आहे. इंग्रजी, हिंदी आणि उर्दू व्यतिरिक्त, NEET परीक्षा 13 भाषांमध्ये घेतली जाईल. उमेदवारांना प्रादेशिक भाषांमध्येही परीक्षेला बसण्याचा पर्याय असेल. NEET परीक्षा 7 मे रोजी घेतली जाईल आणि निकाल 30 जून रोजी जाहीर होण्याची अपेक्षा आहे. मेडिकल, डेंटल, नर्सिंग आणि आयुष मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी 18 लाखांहून अधिक उमेदवार यावर्षी NEET UG परीक्षा देणार आहेत अशी अपेक्षा आहे. 8-10 हजार नाही गड्यांनो, महिन्याला तब्बल 2,40,000 रुपये पगार; अर्जाला अवघा एक दिवस शिल्लक; संधी सोडूच नका नोंदणी करताना विद्यार्थ्यांना भाषा निवडण्याचा पर्याय असेल. तथापि, जर त्याने/तिने कोणत्याही स्थानिक भाषेची निवड केली, तर त्याला/तिला त्याच राज्यात त्याचे केंद्र निवडावे लागेल ज्या राज्यात भाषा निवडली आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या उमेदवाराने मराठी भाषा निवडली असेल, तर त्याला महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र निवडावे लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.