जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / क्या बात है! फ्रेशर्ससाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी; 'या' मल्टिनॅशनल कंपनीत बंपर भरती

क्या बात है! फ्रेशर्ससाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी; 'या' मल्टिनॅशनल कंपनीत बंपर भरती

आयटी कंपनीत Jobs

आयटी कंपनीत Jobs

अ‍ॅमेझॉन सध्या डिव्हाइस असोसिएटच्या रोलसाठी बीटेक फ्रेशर्सची भरती करत आहे. त्यासाठी आवश्यक पात्रता आणि जबाबदाऱ्या याबद्दल माहिती घेऊया

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 डिसेंबर : सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे जगभरातल्या अनेक प्रमुख कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच ट्विटर आणि मेटा या कंपन्यांपाठोपाठ अ‍ॅमेझॉननेदेखील हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे. अ‍ॅमेझॉन ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ई-कॉमर्स, क्लाउड कम्प्युटिंग, ऑनलाइन जाहिराती, डिजिटल स्ट्रीमिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात ही कंपनी काम करते. जगातल्या सर्वांत प्रभावशाली कंपन्यांमध्ये अ‍ॅमेझॉनचा समावेश होतो. आता कंपनीने भारतात नवीन कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅमेझॉन सध्या डिव्हाइस असोसिएटच्या रोलसाठी बीटेक फ्रेशर्सची भरती करत आहे. त्यासाठी आवश्यक पात्रता आणि जबाबदाऱ्या याबद्दल माहिती घेऊ या. याबद्दलचं वृत्त ‘टेक गिग’ने प्रसिद्ध केलं आहे. अ‍ॅमेझॉन आपल्या चेन्नईमधल्या कार्यालयात डिव्हाइस असोसिएट पदासाठी नवीन कर्मचारी भरती करणार आहे. त्यासाठी बीई/बी टेक/ एमसीए/एमएस्सी पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करू इच्छित असणाऱ्या उमेदवाराला दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. अजिबात अनुभव नसलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. अशी संधी पुन्हा नाही! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 12वी पाससाठी बंपर ओपनिंग्स; पात्र आहात ना? करा अप्लाय अर्ज कसा कराल : इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. पात्रता : 1) डिव्हाइस असोसिएट पदासाठी अर्ज करण्यासाठी बीई आयटी, ईसीई आणि ईईई, बीटेक, बीएस्सी किंवा विज्ञान व अभियांत्रिकीसारख्या विषयांमध्ये पदवी आवश्यक आहे. 2) विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आणि त्याच्याशी संबंधित प्रोग्राम्सची (की वर्ड, एक्सेल, इंटरनेट एक्सप्लोरर, फायरफॉक्स) ठोस माहिती असणं आवश्यक आहे. 3) जुळवून घेण्याची आणि नियमित अ‍ॅक्टिव्हिटीज करण्याची क्षमता आवश्यक आहे. 4) पुढाकार घेण्याची वृत्ती, जबाबदारी घेण्याची वृत्ती, स्वयंप्रेरित असणं आणि डेडलाइन पूर्ण करण्याचं आव्हान पार करण्याची क्षमता असली पाहिजे. जबाबदाऱ्या : कंपनी तांत्रिकदृष्ट्या निपुण, सेल्फ मोटिव्हेटेड आणि डिटेल ओरिएंटेड कर्मचाऱ्यांच्या शोधात आहे. या पदावरची व्यक्ती अनेक प्लॅटफॉर्मवर चाचण्या पूर्ण करण्यात मदत करील. ठरलेल्या निकषांनुसार दैनंदिन गुणवत्ता तपासणी करतील आणि डेव्हिएशन्सचे अचूक अहवाल देईल. नवीन उपकरणांसाठी अ‍ॅमेझॉनच्या चाचणी प्रक्रिया, नियम आणि धोरणांची अंमलबजावणी करण्याची कामही ही व्यक्ती करील. एक चूक आणि संपूर्ण करिअर उद्ध्वस्त; पोलीस भरतीसाठी ‘ते’ इंजेक्शन घेण्याचा विचारही करू नका; अन्यथा… की जॉब फंक्शन्स : 1) योग्य कार्यक्षमतेची हमी देण्यासाठी सॉफ्टवेअर, हार्डवेअर चाचण्या करणं. 2) अद्ययावत सराव चाचण्या आणि प्रक्रियांचं मूल्यांकन करणं. ज्ञान आणि सर्वोत्तम पद्धती शेअर करणं. अ‍ॅपची फीचर्स आणि कार्यक्षमतेची सखोल तपासणी करणं. 3) गुणवत्ता आणि उत्पादकता पातळीत नियमितपणा राखणं. आउटपुटच्या बाबतीत शक्य तितक्या सर्वोत्कृष्ट मानकानुसार दररोज नियमित कामं करण्याची क्षमता पार पाडणं. 4) चाचणी प्रक्रिया किंवा गुणवत्ता हमी तपासणी चालू असताना आढळलेल्या त्रुटींची नोंद ठेवणं. 5) एसएलएनुसार प्रगतीचं निरीक्षण करणं. 6) मानवी श्रम, तसंच कोणतंही आवश्यक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आवश्यक असलेली डिव्हाइसेस आणि चाचणी पद्धती अंगीकारण्यास सक्षम असणं. 7) इंग्रजी भाषेचं व्याकरण, वाक्यरचना आणि शब्दसंग्रह आवश्यक. 8) अ‍ॅप्समध्ये खोलवर जाण्याची क्षमता, सर्व व्हर्जन्समधल्या कार्यक्षमतेची तुलना करणं आणि व्हर्जन-स्पेसिफिक बदल सूचित करणं. 9) पडताळणी, विश्लेषण आणि डेटा संकलनाच्या उद्देशासाठी नियमितपणे सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन्सची नियुक्ती करण्यास सक्षम असणं. 10) प्रगतीचा अहवाल देणं, समस्या कम्युनिकेट करणं आणि अडचणी मांडणं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात