मुंबई, 16 डिसेंबर: यंदा बारावीची परीक्षा देणारे आणि ज्यांना पुढे इंजिनिअरींग क्षेत्रात करिअर करायचं आहे असे विद्यार्थी कित्येक दिवसांपासून JEE Mains 2023 च्या तारखांची आणि नोटिफिकेशनची वाट बघत होते. अखेर NTA कडून JEE Mains 2023 च्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. तसंच रजिस्ट्रेशन प्रोसेसही सुरु करण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला या परीक्षेसाठी फॉर्म नक्की कसा भरायचा आणि रजिस्टर कसं करायचं हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. NTA ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, JEE मेन 2023 साठी नोंदणी प्रक्रिया कालपासून म्हणजेच 15 डिसेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. नोंदणीची अंतिम तारीख 12 जानेवारी 2023 आहे. आणि परीक्षा 24, 25, 27, 28, 29, 30 आणि 31 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. यासाठी रजिस्ट्रेशन नक्की कसं करायचं हे जाणून घेऊया. क्या बात है! फ्रेशर्ससाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी; ‘या’ मल्टिनॅशनल कंपनीत बंपर भरती अशा पद्धतीनं करा रजिस्ट्रेशन्स JEE 2023 नोंदणी कशी करावी नोंदणीसाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट- jeemain.nta.nic.in वर जा. वेबसाइटच्या होम पेजवर दिलेल्या JEE मेन 2023 सत्र 1 पर्यायावर जा. यामध्ये तुम्हाला JEE (मुख्य) 2023 सत्र 1 अर्जाच्या लिंकवर जावे लागेल. आता Apply Online च्या लिंकवर क्लिक करा. यानंतर, विनंती केलेले तपशील भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. नोंदणी केल्यानंतर, तुम्ही अर्ज भरू शकता. अर्ज पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रिंट काढा. अशी संधी पुन्हा नाही! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 12वी पाससाठी बंपर ओपनिंग्स; पात्र आहात ना? करा अप्लाय नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई 2023 साठी अधिसूचना जारी केली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, परीक्षा 24 जानेवारी ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत घेतली जाईल. 12 जानेवारीनंतर परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले जाईल. याशिवाय जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे शहर जाहीर केले जाणार आहे. JEE Mains या jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन विद्यार्थी परीक्षेसाठी जारी केलेली संपूर्ण सूचना तपासू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.