मुंबई, 21 मे: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात (RTMNU) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नागपूर विद्यापीठाने उन्हाळी परीक्षांच्या (Nagpur University Summer Exams) तारखा जाहीर केल्या आहेत. नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा (RTMNU summer exams 2022) 8 जूनपासून (RTMNU 2022 exam dates) होणार आहेत. विशेष म्हणजे या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली.
परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले की, परीक्षा मल्टिपल चॉइस प्रश्न (MCQ) स्वरूपात घेण्यात येणार आहे. यासंदर्भात बैठक झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर विद्यापीठाच्या सर्व परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनं घेतल्या जातील असं आधी जाहीर करण्यात आलं होतं. यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड आनंद झाला होता. मात्र यानंतर उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक घेत सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्याच्या सूचना केल्या.
पत्रकारितेत करिअरच्या उत्तम संधी; कोर्सेस आणि कॉलेजेसबद्दल इथे मिळेल माहिती
90 मिनिटे परीक्षा
पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ८ जूनपासून सुरू होणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा 15 जूनपासून आणि इतर सर्व परीक्षा 22 जूनपासून सुरू होतील. प्रत्येक परीक्षेचा पेपर लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना 90 मिनिटे मिळतील. प्रत्येक प्रश्नपत्रिकेत 50 प्रश्न असतील, त्यापैकी फक्त 40 प्रश्नांचा प्रयत्न करावा लागेल.
IMP: जॉब करताना घ्या शिक्षण; ही आहेत राज्यातील टॉप Distance Learning विद्यापीठं
परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे म्हणाले की, परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध केले जाईल. यामध्ये परीक्षेशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींचाही उल्लेख केला जाणार आहे. अशा परिस्थितीत वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचूनच परीक्षेला जावे, असा सल्ला विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Education, Exam Fever 2022, Jobs Exams, Nagpur News