Home /News /career /

कामाची बातमी! जॉब करतानाही सुरु ठेवता येईल शिक्षण; ही आहेत राज्यातील टॉप Distance Learning विद्यापीठं

कामाची बातमी! जॉब करतानाही सुरु ठेवता येईल शिक्षण; ही आहेत राज्यातील टॉप Distance Learning विद्यापीठं

टॉप डिस्टन्स लर्निंग युनिव्हर्सिटीज

टॉप डिस्टन्स लर्निंग युनिव्हर्सिटीज

आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशाच काही टॉप डिस्टन्स लर्निंग युनिव्हर्सिटीजबद्दल (Top 5 Distance learning Universities) सांगणार आहोत आणि त्यांची माहिती देणारआहोत.

    मुंबई, 20 मे: आजकालच्या काळात प्रत्येकाचंच आयुष्य धावपळीचं आणि चॅलेंजेसनं भरलेलं आहे. त्यामुळे नोकरी करणं आवश्यक झालंय. पण अनेकदा नोकरीच्या मागे धावत असताना आपण शिक्षणात मागे पडतो. तसंच नोकरी (Latest Jobs) सुरू असतानाही आपल्याला काही शिकण्याची इच्छा असते. मात्र यासाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही. याचसाठी काही विद्यापीठांकडून डिस्टन्स लर्निंग कोर्सेस (Top Distance learning courses) घेतले जातात. यामध्ये पार्ट टाईममध्ये कुठलंही शिक्षण घेण्याची सुविधा असते. तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशाच काही टॉप डिस्टन्स लर्निंग युनिव्हर्सिटीजबद्दल (Top 5 Distance learning Universities) सांगणार आहोत आणि त्यांची माहिती देणारआहोत. डिस्टन्स लर्निंग म्हणजे काय? साधारणतः डिस्टन्स लर्निंगमध्ये (What is Distance Learning?) ऑनलाईन शिक्षण किंवा पार्ट टाइम शिक्षणाचा (Part Time Education) समावेश होतो. डिस्टन्स लर्निंग करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊन दिवसभर क्लासेस करण्याची गरज पडत नाही. तुमचा वेळ वाचवण्यासाठी ही शिक्षणाची पद्धत आहे. यात तुम्हाला नोकरी करता करता किंवा व्यवसाय करताना शिक्षण घेता येतं. विशेष म्हणजे यासाठी कुठल्याही शहराची मर्यादा नाही. जगभारतील कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून (Top Universities) तुम्ही डिस्टन्स लर्निंग करू शकता. Study Abroad: परदेशात शिक्षणासाठी GRE परीक्षा महत्त्वाची; कसं असतं Exam Pattern आणि पात्रता? जाणून घ्या या आहेत महाराष्ट्रातील टॉप Distance Learning Universities 1. डॉ. डी, वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबई, महाराष्ट्र (Dr DY Patil University, Navi Mumbai, Maharashtra) 2. भारती विद्यापीठ, पुणे, महाराष्ट्र (Bharti Vidyapeeth University, Pune, Maharashtra) 3. मुंबई विद्यापीठ, मुंबई, महाराष्ट्र (University of Mumbai, Mumbai, Maharashtra) 4. सिम्बायोसिस सेंटर ऑफ डिस्टन्स लर्निंग, पुणे, महाराष्ट्र (Symbiosis Centre for Distance Learning, Pune, Maharashtra) 5. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, महाराष्ट्र (Shivaji University, Kolhapur, Maharashtra) 6. टाटा सामाजिक विज्ञान संस्थान, मुंबई, महाराष्ट्र (Tata Institute of Social Sciences, Mumbai, Maharashtra) 7. बालाजी आधुनिक व्यवस्थापन संस्था, पुणे, महाराष्ट्र (Balaji Institute of Modern Management, Pune, Maharashtra) 8. वायसीएम मुक्त विद्यापीठ, नाशिक, महाराष्ट्र (YCM Open University, Nashik, Maharashtra) 9. एसआरटीएम युनिव्हर्सिटी, नांदेड, महाराष्ट्र (SRTM University, Nanded, Maharashtra) क्या बात है! कमी वेळात जास्त पैसे कमवण्याची संधी देतील 'हे' Part Time Jobs 10. सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, पुणे, महाराष्ट्र (Sinhgad Technical Education Society, Pune, Maharashtra) 11. संत गागडे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, महाराष्ट्र (Sant Gagde Baba Amravati University, Amravati, Maharashtra) 12. इंदिरा आंतरराष्ट्रीय डिस्टन्स लर्निंग अकादमी, पुणे, महाराष्ट्र (Indira International Distance Education Academy, Pune, Maharashtra)
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Education, Job, Job alert

    पुढील बातम्या