मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Mumbai Police Recruitment: पोलीस भरतीत 'हुशारी' चालणार नाही! मॅग्नेटिक बेल्ट, सेन्सर शूजद्वारे होणार शारीरिक चाचणी

Mumbai Police Recruitment: पोलीस भरतीत 'हुशारी' चालणार नाही! मॅग्नेटिक बेल्ट, सेन्सर शूजद्वारे होणार शारीरिक चाचणी

पोलीस भरतीत 'हुशारी' चालणार नाही!

पोलीस भरतीत 'हुशारी' चालणार नाही!

Mumbai News: सहआयुक्त (प्रशासन) एस जयकुमार आणि डीसीपी (मुख्यालय-II) तेजस्वी सातपुते यांच्याकडून या प्रयोगाचे निरीक्षण केले जाईल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 6 जानेवारी : मुंबई पोलीस आता आपल्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तांत्रिक उपायांचा वापर करणार आहेत. छातीचा आकार मोजण्यासाठी मॅग्नेटिक बेल्ट आणि पाय जमिनीवर घट्ट ठेवण्यासाठी सेन्सर असलेले उंच टाचांचे शूज वापरण्यात येणार आहे. या महिन्याच्या शेवटी शारीरिक चाचणी दरम्यान हे तंत्रज्ञान वापरले जाऊ शकते. कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर कॉन्स्टेबलच्या 8,000 हून अधिक पदांसाठी 7 लाखांहून अधिक अर्जदार शारीरिक आणि लेखी परीक्षेत सहभागी होणार आहेत. या प्रक्रियेला काही महिने लागण्याची शक्यता आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, राज्यभरात भरती मोहीम सुरू आहे. परंतु, तांत्रिक उपायांचा अवलंब करणारे मुंबई हे पहिले राज्य ठरणार आहे. सहआयुक्त (प्रशासन) एस जयकुमार आणि डीसीपी (मुख्यालय-II) तेजस्वी सातपुते यांच्याकडून या तंत्रज्ञानाचे निरीक्षण केले जाईल. किमान मानवी हस्तक्षेप सुनिश्चित करण्यासाठी, या वर्षी वापरल्या जाणार्‍या उपकरणांमध्ये मॅग्नेटिक बेल्ट, सेन्सर हील्स, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) टॅग, प्रिझम स्टिक आणि अनेक फोटो यांचा समावेश आहे.

मॅग्नेटिक बेल्ट का वापरला जाणार?

मॅग्नेटिक बेल्टबद्दल स्पष्टीकरण देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, भरतीसाठी छातीचे माप अनेकदा महत्त्वाचे असल्याचे सिद्ध होते. लोकांची स्वप्ने अनेकदा काही इंचांच्या फरकाने अधुरी राहतात. सामान्य टेपमध्ये त्रुटीसाठी जागा आहे. टेप किती घट्ट किंवा सैल आहे यावर मोजमाप अवलंबून असते, त्यामुळे मॅग्नेटिक बेल्ट अधिक अचूक असेल. यात चूक होण्याची शक्यता नाही.

वाचा - ऑफिसला ये-जा करताना यूट्युबवरुन केला अभ्यास, अन् थेट बनला IAS अधिकारी!

उंची मोजणारे सेन्सर शूज

उंची मोजताना, अर्जदार अनेकदा त्यांच्या पायाच्या बोटांवर उभे राहतात. टाच अशा प्रकारे उचलतात की तुम्ही त्यांची फसवणूक पकडण्यात अपयशी होऊ शकता, म्हणून आता सेन्सर टाच लावल्या जातील. आता अर्जदारांची उंचीही अचूक मोजता येणार आहे. त्याच वेळी, धावण्याच्या दरम्यान अर्जदारांचा वेग मोजण्यासाठी पोलीस RFID (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) टॅग वापरणे सुरू ठेवतील. धावपटूंना RFID टॅग दिले जातील, जे अंतर आणि वेळ मोजतील आणि संगणकावर माहिती फीड करतील. पुरुषांना दोन शर्यतींमध्ये भाग घ्यायचा असतो, एक म्हणजे 1,600 मीटर आणि दुसरी 100 मीटर डॅश आणि शॉट-पुट, तर महिलांना शॉटपुट व्यतिरिक्त 800 मीटर आणि 100 मीटरमध्ये धावावे लागते.

वाचा - सर्वात मोठी कर्मचारी कपात, 18 हजार कर्मचाऱ्यांना Amazon देणार नारळ

शॉट पुटसाठी प्रिझम स्टिकचा वापर केला जाणार

अधिकाऱ्याने सांगितले की, शॉट पुटसाठी थ्रोचे अंतर मोजण्यासाठी प्रिझम स्टिकचा वापर केला जाईल. प्रिझममध्ये एक सेन्सर असेल, ज्याद्वारे डेटाबेस तयार केला जाईल. भरती प्रक्रियेत दोन फेऱ्यांचा समावेश होतो - शारीरिक चाचणी, त्यानंतर लेखी चाचणी. मुंबई पोलिसांना लेखी परीक्षेसाठी 7.03 लाख अर्जदारांची यादी 80,700 पर्यंत कमी करायची आहे.

जानेवारीच्या अखेरीस भरती प्रक्रिया सुरू होईल

मुंबई पोलिसांची भरती प्रक्रिया जानेवारीच्या अखेरीस सुरू होणार आहे. गेल्या वर्षी 18 लाख अर्ज आले होते. मुंबईत 7.03 लाख - राज्यभरात पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबलच्या 18,331 पदांसाठी प्राप्त झाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर, तृतीय लिंग श्रेणीसाठी अर्ज केलेल्या ट्रान्सपर्सन्सकडून पोलिसांना 73 अर्ज प्राप्त झाले. 18,331 पदांपैकी एक मोठा भाग – 8,070 – मुंबई पोलिसांसाठी राखीव आहेत, तर उर्वरित इतर 44 पोलिस युनिट्समध्ये आहेत. दरवर्षी सुमारे 1,200 पोलीस निवृत्त होतात, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, साधारणपणे सरासरी 1,500 पदे भरली जातात.

First published:

Tags: Mumbai police