नवी दिल्ली, 6 जानेवारी : देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा. देशातील लाखो विद्यार्थी दरवर्षी ही परीक्षा देतात. मात्र, खूप जण ही परीक्षा पास होतात. सरकारी नोकरी मिळाल्यानंतरही, UPSC ची तयारी करणे आणि ही परीक्षा उत्तीर्ण करणे तितके सोपे नाही. मात्र, काही जण न थकता, न डगमगता शेवटपर्यंत प्रयत्न करतात आणि आपले ध्येय गाठतात.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका ध्येयवेड्या तरुणाचा प्रवास सांगणार आहोत. प्रदीप सिंग असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. प्रदीप सिंग यांनी एसएससीद्वारे टॅक्स विभागातील नोकरी करताना UPSC तयारी सोडली नाही आणि शेवटी UPSC नागरी सेवा परीक्षा 2019 मध्ये प्रथम क्रमांक मिळवला.
हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या प्रदीप सिंग यांनी UPSC नागरी सेवा परीक्षा 2019 मध्ये संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक मिळवून अव्वल स्थान पटकावले. पदवीनंतर त्यांनी प्रथम एसएससीची तयारी केली. त्यानंतर त्यांना दिल्लीतील टॅक्स ऑफिसमध्ये नोकरी मिळाली. पण त्यांनी आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न सोडले नाही. त्यांनी चार वेळा यूपीएससीची परीक्षा दिली आणि अखेर आपल्या स्वप्नांना गवसणी घातली.
हेही वाचा - गरोदरपणाच्या 9व्या महिन्यात दिली UPSC परीक्षा, 'त्या' एका संधीने संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले
लंचब्रेक दरम्यान अभ्यास -
नोकरी करत असताना प्रदीप यांनी यूपीएससीची तयारी केली. या दरम्यान त्यांना जिथे वेळ मिळेल तिथे त्यांनी त्याचा उपयोग केला. ऑफिसला येतानाही यूट्यूबच्या माध्यमातून अभ्यास केला. ऑफिसमध्ये जेवतानाही त्यांनी अभ्यास केला. दुपारच्या जेवणाच्या वेळी अभ्यासाची संधी मिळावी म्हणून ते कार्यालयातील कामे लवकर उरकत असत.
UPSC उत्तीर्ण होण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे -
ज्या दिवशी ऑफिसचे काम लवकर संपायचे त्यादिवशी ते वरिष्ठांना सांगून लवकर घरी जायचे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही त्यांना पूर्ण सहकार्य केले. वेळेच्या व्यवस्थापनाशिवाय UPSC पास करणे कठीण आहे. म्हणून वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे, असे प्रदीप यांचे मत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Ias officer, Inspiring story, Success story, Upsc, Upsc exam