मुंबई, 26 फेब्रुवारी: सध्या कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था मंदावली आहे, कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या. तर नुकतंच शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसमोरही संकट उभं राहिलं आहे. आता परिस्थिती थोडी सावरल्यानं पुन्हा एकदा अर्थचक्र वेग धरू लागलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खासगी आणि सरकारी पातळीवरही नोकर भरती सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील तरुणांसाठीही एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Board) म्हणजेच एमएसईबीमध्ये (MSEB) मोठ्या संख्येनं पद भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडमध्ये बारावी पास असलेल्यांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्युत सहायक आणि उपकेंद्र सहाय्यक या पदांसाठी ही भरती होते आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी अर्जदारांनी www.mahadiscom.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करायचा आहे. हे वाचा - खुशखबर! 2021मध्ये पगारात होणार मोठी वाढ, वाचा कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक फायदा अर्जधारक कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास असणे अत्यावश्यक आहे. याविषयी अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेली आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षादरम्यान असावे. माजी सैनिक आणि अपंग व्यक्तीसाठी ही वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत असून, आरक्षित वर्गासाठी यामध्ये 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. या पदासाठी लेखी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 22 फेब्रुवारी 2021 पासून झाली आहे. 20 मार्च 2021 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. दिलेल्या अटींनुसार योग्य पद्धतीनं भरलेला अर्जच ग्राह्य धरण्यात येणार आहे. अर्जामध्ये कोणतीही त्रुटी आढळल्यास तो रद्द केला जाईल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक सर्व सूचना वाचून अर्ज करणं महत्त्वाचं आहे. हे वाचा - RBI Office Attendant : दहावी पास असाल तर RBI मध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या परीक्षेचा पॅटर्न या पदांसाठी होणार भरती विद्युत सहायक उपकेंद्र सहायक खेळाडू 250 98 माजी सैनिक 750 300 प्रोजेक्टेड 250 99 महिला 1500 600 जनरल 1637 656
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.