नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : भारतीय रिजर्व्ह बँकेनं ऑफिस (Indian Reserve Bank) अटेंडंटच्या पदांसाठी (post of attendant) भरती करण्यास मोठी व्हॅकन्सी जाहीर केली आहे. नोटिफिकेशननुसार 841 रिकाम्या जागांवर भरती होणार आहे. (RBI Vacancy 2021) या पदांसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. (CBT Exam for SSC pass candidates) उमेदवारांना या संधीचा लाभ घेण्यासाठी परीक्षेचा अभ्यासक्रम आणि त्याचा पॅटर्न समाजवून घेणं गरजेचं आहे. (Syllabus and pattern of CBT Exam) ऑफिस अटेंडन्ट भरतीसाठी सीबीटी परीक्षेचा अभ्यासक्रम (office attendant CBT exam) क्वांटिटिव्ह ऍप्टिट्यूड टेस्ट वेळ आणि लांबीचा गुणोत्तर, वेळ आणि कार्य, लघुत्तम सामाईक विभाजक आणि महत्तम सामाईक विभाजक, सरळ आणि चक्रवाढ व्याज, आकलनक्षमता, संभाव्यता, टक्केवारी, पाईप आणि सिस्टर्न, क्रमचय आणि संयोजन इत्यांदींशी संबंधित प्रश्न विचारले जातात. जनरल अवेअरनेस भारतासह जगाचे करंट अफेअर्स, भूगोल, इतिहास आणि राजनीतिक शास्त्र, सामान्य विज्ञान, बजेट, भारतीय अर्थव्यवस्था इत्यादींशी संबंधित प्रश्न यात विचारले जातात. रिझनिंग नंबर सिरीज, नातेसंबंध, कोडिंग-डिकोडिंग, चिन्ह, रो अरेंजमेंट, तुल्यभाव, डायरेक्शन बेस्ड कन्सेप्ट, ऑड वन आउट इत्यादी इंग्रजी भाषा वाचन-आकलन, समानार्थी शब्द, वाक्य सुधारणे, शब्दांचे अर्थ इत्यादी - संगणक आधारित परीक्षेसाठी (CBT) 90 मिनिटांचा वेळ असेल. - ही परीक्षा 120 मार्कांची असेल. - चारी भंगांतून 30-30 मार्कांचे प्रश्न विचारले जातील. - सीबीटी परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगपण असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश मार्क कापले जातील. - अंतिम निवड सीबीटी परीक्षेत मिळालेल्या अंकांच्या आधारावर होईल. भाषा प्राविण्य चाचणी - सीबीटी परीक्षेत पास झाल्यावर भाषा प्राविण्य परीक्षा होईल - ही चाचणी क्वालिफाईंग पद्धतीची असेल. - स्थानिक भाषेची चाचणी होईल
परीक्षेच्या तयारीसाठी टिप्स - परीक्षेत त्याच प्रश्नांची उत्तरं द्या ज्यांची उत्तरं तुम्हाला निश्चितपणे माहीत असतील. - आरबीआय ऑफिसर अटेन्डन्टचे सॅम्पल पेपर सोडावा. - खूप मॉक टेस्ट्स द्या. यातून कमतरता दूर करण्यास मदत मिळेल. - जे वाचाल त्याचं रिव्हीजनही करा - संतुलित आहार घ्या - आठ तासांची झोप घ्या.