मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Breaking: महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; MPSC नं जारी केली 420 जणांची अंतिम यादी

Breaking: महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; MPSC नं जारी केली 420 जणांची अंतिम यादी

आधीच कोरोनाच्या काळामुळे या परीक्षा लांबणीवर ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आधीच कोरोनाच्या काळामुळे या परीक्षा लांबणीवर ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

2019 साली झालेल्या या परीक्षेचा निकाल अखेर लावण्यात आला आहे.

मुंबई, 28 सप्टेंबर: गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रलंबित असलेला महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेचा निकाल (MPSC Result) आज अखेर जाहीर करण्यात आला आहे. 2019 साली (MPSC 2019 exam result) ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र त्यानंतर कोरोनामुळे हा भरतीचा निकाल लागण्यास उशीर झाला होता. तसंच मराठा आरक्षणाचा (MPSC and Maratha Reservation) मुद्दाही ऐरणीवर असल्यामुळे हा निकाल लागण्यास उशीर झाला होता. अनेक जणांना पद मिळूनही त्याच्या नियुक्त्या होऊ शकल्या नव्हत्या. हा मुद्दा न्यूज 18नं सतत लावून धरला होता. मात्र आता अखेर हा निकाल लावण्यात आला आहे.

उपजिल्हाधिकारी, डिवायएसपी, तहसीलदार पदांसाठी  ही भरती घेण्यात आली होती. MPSC ना या निकालात निवड झालेल्या एकूण  420 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून निकालाची वाट बघणाऱ्या उमेदवारांना आता MPSC नं दिलासा दिला आहे.

हे वाचा -  MPSC Special: जिद्दीनं तहसीलदारपदी झाली निवड पण नियुक्तीच नाही; निवडला हा मार्ग

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 13  ते 15 जुलै, 2019 या कालावधोत राज्य सेवा (मुख्य) परीक्षा - 2019 घेण्यात आली होती. त्यानंतर कोरोना महामारीमुळे आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यामुळे या परीक्षेचा निकाल लांबणीवर गेला होता. मात्र आता अखेर शासन निर्णयानंतर हा निकाल लावण्यात आला आहे.

शासनाकडून आलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनेनुसार  सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरीता आरक्षित असलेली पदं ही खुल्या प्रवर्गामध्ये रूपांतरित करण्यात आली आहेत.

सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा निकाल लावण्यात आला आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गातून प्रसाद चौगुले यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर मागास वर्गातून रोहन कुंवर यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. तसंच महिला प्रवर्गातून मानसी पाटील यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे.

हे वाचा - परीक्षांचा आता नवा घोळ; आरोग्य विभाग आणि शिक्षक पात्रता परीक्षा एकाच दिवशी

पुण्यातील MPSC चा विद्यार्थी स्वप्नील लोणकर यानं नियुक्ती नसल्यामुळे आत्महत्या केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात MPSC चा मुद्दा चांगलाच गाजला होता.  त्यानंतर आता हा निकाल लावण्यात आल्यामुळे राज्यातील अनेक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

First published:
top videos

    Tags: Exam result, Mpsc examination