मुंबई, 05 जून: नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET UG 2022) ची प्रवेशपत्रे नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे लवकरच जारी केली जाणार आहेत. NEET UG 2022 ची परीक्षा (NEET UG Exam 2022 date) 17 जुलै 2022 रोजी घेतली जाणार आहे. म्हणूनच NEET परीक्षेची तारीख (NEET exam date 2022) जवळ आल्याने NTA लवकरच परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करणार आहे. मात्र एकीकडे प्रवेशपत्र येणार आहेत तर दुसरीकडे विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी जय्यत तयारी सुरू आहे. यावेळी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेसाठी सुमारे 2.5 लाख अधिक अर्ज आले आहेत. अर्जदारांची संख्या 18 लाखांहून अधिक झाली आहे, त्या दृष्टीने NEET 2022 चा कटऑफ जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना टॉप करण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागणार आहे.जर तुम्हीही NEET परीक्षेची तयारी करत असाल तर ही बातमी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला NEET परीक्षेसाठी मॉक टेस्ट (Mock Tests for NEET UG 2022) कुठे आणि कशा पद्धतीनं देता येतील हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. बोर्डाच्या निकालाआधीच विद्यार्थी ऑन फायर; 11वीसाठी लाखांवर विद्यार्थ्यांचे अर्ज
डॉक्टर होण्यासाठी NEET सारख्या कठीण परीक्षेला सामोरं जाण्याची तयारी अनेक जण दाखवतात. मात्र निकालानंतर म्हणावा तसा निकाल लागत नाही. याच प्रमुख कारण म्हणजे कमी पडलेली मेहनत आणि मॉक टेस्ट न देणं. अनेक विद्यार्थी परीक्षेच्या आधी मॉक टेस्ट देत नाहीत आणि यामुळे त्यांना चांगले मार्क्स मिळू शकत नाही.
पण आता असं होणार नाही. NEET च्या परीक्षेसाठी आलेल्या मॉक टेस्टमुळे तुम्हाला सर्व प्रकारचे टेस्ट पेपर्स देता येतील आणि यामधून तुम्हाला नक्की पेपरचं पॅटर्न कसं असतं हे जाणून घेता येईल. तसंच यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. बोर्डाचा निकाल लागला म्हणजे विषय संपत नसतो; रिझल्टनंतर ‘या’ IMP गोष्टी आधी कराच कसं डाउनलोड कराल Admit Card उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबरची आवश्यकता असणार आहे . NTA च्या ऑफिशिअल वेबसाइटला भेट देऊन विद्यार्थी त्यांच्या लॉगिन आयडीद्वारे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकणार आहेत. प्रवेशपत्राशी संबंधित अपडेट्स जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना NTA च्या अधिकृत वेबसाइटला भेट देत राहावं लागणार आहे.
| TITLE | LINK |
|---|---|
| NEET Mock Test | https://www.topperlearning.com/neet/mock-test-start-29 |
या मॉक टेस्टच्या लिंक ओपन करून तुम्हाला NEET परीक्षेच्या सर्व मॉक टेस्ट देता येतील. तसंच यामुळे तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्यात मदत होईल. तसंच Toppers Learning या वेबसाईटच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर उमेदवारांना एक मॉक टेस्ट फ्री देता येणार आहे.

)







