मुंबई, 04 जून: महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे दहावी आणि बारावीचे निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यात अकरावी प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया
(Class 11th Online Admission process) सुरू करण्यात आली आहे. यासाठी 30 मे 22 पासून ऑनलाईन अर्जप्रकिया
(11th standard admission process in Maharashtra) सुरू करण्यात आली आहे. ही अर्ज प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. मात्र नोंदणीच्या प्रक्रियेला अवघे काही दिवस झले असतानाच विद्यार्थ्यांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी प्रचंड उत्साह बघायला मिळत आहे.
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणेजच भाग-I 30 मे पासून सुरू झाला आहे. या तारखेपासून 11 वीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी
(Class 11th Online Admission) सुरू करू शकतील. तसेच दहावीचा निकाल
(Class 10 Results) जाहीर झाल्यानंतर या अर्जाचा दुसरा टप्पा म्हणजेच भाग-II भरता येणार आहे. मात्र अवघ्या चार ते पाच दिवसांमध्ये राज्यभरातील लाखोंच्या वर विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे.
MSBTE Admissions: 11वी नंतर आता पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियाही सुरु; रिझल्टच्या आधीच करता येईल अर्ज
संबंधित अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये होणार आहे. या प्रक्रियेसाठी नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना जिथे त्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशा महाविद्यालयांची प्राधान्य यादी द्यावी लागेल. या प्राधान्य फॉर्ममध्ये किमान एक आणि जास्तीत जास्त 10 महाविद्यालयांची नावे भरता येतील. विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार आहे. तसंच ज्या शहरांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्या शहरांची वेगळी वेबसाईट देण्यात आली आहे.
आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी केली नोंदणी
अकरावी प्रबंधासाठी राज्यभरातून पाच शहरांमध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरु आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती शहरांचा समावेश आहे. ही सर्व शहरं मिळून एकूण 1,07,050 इतक्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. तसंच नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही वाढतच चालली आहे.
कोणत्या विभागात किती नोंदणी
मुंबई विभाग - 61,078
पुणे आणि PCMC विभाग - 31,123
नागपूर विभाग - 6,942
नाशिक विभाग - 5,446
अमरावती विभाग - 2,461
MH BOARD 10TH AND 12TH RESULT: अवघ्या काही दिवसांत बोर्डाचा निकाल; रिझल्टनंतर 'या' IMP गोष्टी आधी करा
कोणत्या शहरासाठी कोणती वेबसाईट
मुंबई - mumbai.11thadmission@gmail.com
नागपूर - nagpur.11thadmission@gmail.com
पुणे - 11thonlineadmissiondydpune@gmail.com
नाशिक - nashik.11centralize@gmail.com
अमरावती - amravati.11centralize@gmail.com
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.