मुंबई, 14, जून: महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल काही दिवसांआधी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही अर्ज प्रक्रिया दोन विभागांमध्ये घेण्यात आली होती. यामध्ये निकालाआधीच पहिला टप्पा सुरु करण्यात आला होता. तर अर्ज प्रक्रियेचा दुसरा टप्पा निकालांनंतर सुरु झाला आहे. आता अकरावीची पहिली गुणवत्ता यादी ही जूनला जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेशासाठी लगबग सुरु आहे. पण प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला काय कागदपत्रं महत्त्वाचे असतील हे माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया. बाबो! मराठी मिडीयमच्या पेपरमध्ये चक्क हिंदी आणि इंग्रजीत प्रश्न? ‘या’ विद्यापीठाचा अजब कारभार समोर दहावीनंतर प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रं दहावीची मार्कशीट (10th Class marksheet) दहावीचा डिप्लोमा (10th Class Diploma) लिव्हिंग सर्टिफिकेट (School Leaving certificate) घरच्या पत्त्याचा पुरावा किंवा डोमेसीएल सर्टफिकेट(Resident Certificate/Domicile) जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC Certificate if you belongs to any minority caste.) आधार कार्ड (Aadhar Card.) पॅन कार्ड (Pan Card) पासपोर्ट फोटो (Passport size Photo) तसंच वरील सर्व कागपत्रांच्या झेरॉक्सचे काही सेट्सही स्वतःजवळ ठेवा म्हणजे तुम्हाला वेळेवर धावाधाव करावी लागणार नाही. Success Story: अवघ्या 18 रुपये रुपये पगारावर घासले भांडे, टेबलही पुसले; आज ते आहेत 300 कोटींच्या कंपनीचे मालक विद्यार्थ्यांना आता कनिष्ठ महाविद्यालयीन प्रवेशाचे वेध लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी इयत्ता अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया निकालाआधीच सूरू करण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक आणि अमरावती या शिक्षण विभागात ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे.
कोणत्या शाखेला किती जागा मुंबई महानगर क्षेत्रात 11वीच्या प्रवेशासाठी गेल्यावर्षी तीन लाख 73 हजार जागा होत्या. यंदा त्यांमध्ये चार हजार 320 जागांची वाढ झाली. आहे. याअंतर्गत यावेळी आर्ट्स शाखेला 49 हजार 390 जागा, वाणिज्य शाखेला दोन लाख 2 हजार 240, विज्ञान शाखेला एक लाख 21 हजार 520 जागा, तर एचएसव्हीसी अभ्यासक्रमाला पाच हजार पाच जागा उपलब्ध आहेत.